मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PakvsAfg : अली आला धावून, पाकचा अफगाणिस्तानवर विजय

PakvsAfg : अली आला धावून, पाकचा अफगाणिस्तानवर विजय

 
अफगान टीमने दिलेले 147 रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमची चांगलीच दमछाक झाली.

अफगान टीमने दिलेले 147 रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमची चांगलीच दमछाक झाली.

अफगाणिस्तान टीमने दिलेले 147 रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमला चांगलीच दमछाक झाली.

  • Published by:  sachin Salve

दुबई, 29 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup-2021)  पाकिस्तान (Pakistan Cricket Team) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अटीतटीच्या लढतीत अखेर पाकिस्तानने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने 5 गडी राखून अफगान टीमवर विजय मिळवला आहे. असिफ अलीने (Asif Ali) शानदार 4 सिक्स लगावत टीमला विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तान टीमने दिलेले १४७ रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमला चांगलीच दमछाक झाली. ओपनिंग जोडी तिसऱ्याच ओव्हरमध्ये फुटली. मोहम्मद रिझवान ८ रन्स करून आऊट झाला. त्यानंतर बाबर आझमने दमदार बॅटिंग करत ५१ रन्स करत अर्धशतक ठोकले.

Bharti University Recruitment: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी भरती

आझमच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला खरा पण त्यानंतर जमान ३० रन्स करून बाद झाला. मोहम्मद हाफिज 10 रन्स करून बाद झाला. तर शोअब मलिक आणि असिफ अलीने संयमी खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. अलीने १९ व्या ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावत विजयाचा मार्ग मोकळा केला.  19 ओव्हरमध्ये 148 धावा करत पाकने विजय मिळवला.

Video Call केला आणि...; Google CEO Sundar Pichai यांच्याकडूनही झाली 'ती' चूक

त्याआधी अफगानिस्तानचा कॅप्टन मोहम्मद नबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित 20 ओव्हरर्समध्ये १४७ धावा केल्या होत्या. पण, अफगान टीमची सुरुवात निराशाजनक राहिली. ओपनिंग जोडी झटपट आऊट झाली. त्यानंतर आलेल्या इतर खेळाडूंनी रन्स वाढवण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर मधल्या फळीत अफगान टीमकडून कॅप्टन मोहम्मद नबी आणि गुलबदीन नईबने नाबाद 35-35 रन्स केले.  दोन्ही खेळाडूंनी 7व्या विकेटसाठी  45 चेंडूमध्ये 71 रन्स केले. पाकिस्तानकडून  इमाद वसीमने दोन विकेट मिळवल्या. तर शाहीन अफरीदी, हसन अली, शादाब खान आणि हॅरिस रऊफने प्रत्येकी एक-एक विकेट मिळवल्या.

First published: