मुंबई, 8 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेली आयसीसी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान या चार टीम्स सेमी फायनलमध्ये पोहचल्या आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल गुरूवारी होणार आहे. या लढतीसाठी टीम इंडिया अॅडिलेड ओव्हल येथे दाखल झाली असून, टीमने प्रॅक्टिस सुरू केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या लढतीपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्यानं क्रिकेट चाहते चिंतेत पडले होते.
नेट प्रॅक्टिस करताना रोहितच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला खूप वेदना होत असल्याचं समजलं होतं; मात्र सुदैवाने त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. टीमच्या मेडिकल स्टाफने रोहितच्या दुखापतीची तपासणी केली. त्यानंतर तो पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसला. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रोहितच्या उजव्या हाताला दुखापत
10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडिलेडमध्ये दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. या मॅचसाठी कॅप्टन रोहित शर्मा नेट प्रॅक्टिस करत होता. त्या वेळी त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीनंतर काही काळ त्याला प्रचंड वेदना होताना दिसल्या. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून टीमच्या फिजिओंनी त्याच्या दुखापतीची तपासणी केली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Rohit Sharma hit on the right hand while batting in the nets and seems to be in great pain. Physios have run in to give him attention #T20WorldCup pic.twitter.com/MDraoGS1mN
— Bharat Sundaresan (@beastieboy07) November 8, 2022
या व्हिडिओमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला; मात्र काही वेळातच रोहित शर्मा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसला. याचा अर्थ त्याची दुखापत फार गंभीर नाही. तो सेमी फायनलमध्ये खेळू शकेल.
Indian captain Rohit Sharma hit on his right hand during a practice session in Adelaide ahead of the semi-final match against England. pic.twitter.com/HA4xGJDC51
— ANI (@ANI) November 8, 2022
सध्या सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा फार चांगल्या बॅटिंग फॉर्ममध्ये दिसला नाही; मात्र एक कॅप्टन म्हणून त्याने टीमसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धची मॅच अतिशय महत्त्वाची आहे. अशा स्थितीत टीमचा कॅप्टन टीमसोबत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे त्याला दुखापत झालेली भारतीय संघ व्यवस्थापनाला अजिबात परवडणार नाही.
पत्नीनं तयार केलेल्या 'या' नियमांमुळे सूर्यकुमार यादव मैदानावर करू शकतो फटकेबाजी
रोहितने प्रथमच वर्ल्ड कपमध्ये टीमचं नेतृत्व केलं आहे. उत्तम कॅप्टन तोच असतो जो टीमचं योग्य नेतृत्व करतो. खेळाडूंचं मनोधैर्य खचू न देता त्यांना सतत प्रोत्साहित करतो. रोहित शर्माने आतापर्यंत या आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. 2007मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता लाखो भारतीय चाहत्यांना रोहितच्या टीमकडून मोठ्या आशा आहेत. सध्याची भारतीय टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, T20 world cup 2022