Home /News /sport /

T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली शोएब अख्तरची खिल्ली, म्हणाला...

T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली शोएब अख्तरची खिल्ली, म्हणाला...

T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली अख्तरची खिल्ली, म्हणाला...

T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली अख्तरची खिल्ली, म्हणाला...

काही दिवसातच सुरु होणाऱ्या T20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्यासंदर्भात दोन्ही देशांकडून प्रतिक्रियांची फैरी झाडल्या जात आहेत.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: आयपीएल नंतर क्रिकेट जगतात आता T20 वर्ल्डकपचे(T20 World Cup 2021) वारे वाहू लागले आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्याआधी पाककडून खोचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगनेही(Harbhajan Singh) आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हरभजनने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना काही दिवसातच सुरु होणाऱ्या T20 वर्ल्डकपवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्याने खात संदेश देत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला डिवचले आहे. हे वाचा- T20 World Cup : या टीमविरुद्ध भारताचं रेकॉर्ड खराब, एकही सामना जिंकला नाही तो म्हणाला, “मी शोएब अख्तरला आधीच सांगितले आहे की, खेळून काही उपयोग नाही. तू आमच्याबरोबर खेळशील, आणि पुन्हा हरशील आणि मग निराश होशील. काही उपयोग नाही. येथे पाकिस्तानसाठी कोणतीही संधी नाही. आमचा संघ खूप मजबूत आहे आणि तुमच्या संघाला सहज हरवेल.’ असे म्हणत भज्जीने अख्तरला तगजे आवाहन दिले आहे. यूएईला रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या संघाचा आत्मविश्वास आणि उद्दिष्टे याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. आमचे लक्ष पहिल्या सामन्यात भारताला हरवणे आणि तीच लय कायम राखत पुढे जाणे हे आहे. असे म्हटले होते. हे वाचा- पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, World Cup मध्ये खेळणारा खेळाडू फिक्सिंगमध्ये अडकला वर्ल्डकप स्पर्धा मग ती, टी -२० किंवा वन डे असो, पाकिस्तान क्रिकेट संघाने आजपर्यंत भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने सर्व सामने जिंकले आहेत. टी -२० विश्वचषकादरम्यान, भारतचा पाकिस्तानने एकूण ५ वेळा सामना केला, ज्यामध्ये भारताने ४ सामने जिंकले तर एक सामना अनिर्णीत राहिला. म्हणजेच विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक दोन्हीमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध कधीही विजय मिळवला नाही.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Harbhajan singh, India vs Pakistan, T20 cricket, T20 world cup

    पुढील बातम्या