मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : या टीमविरुद्ध भारताचं रेकॉर्ड सगळ्यात खराब, एकही सामना जिंकला नाही!

T20 World Cup : या टीमविरुद्ध भारताचं रेकॉर्ड सगळ्यात खराब, एकही सामना जिंकला नाही!

17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होत आहे, पण या स्पर्धेतला सगळ्यात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 ऑक्टोबर : 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होत आहे, पण या स्पर्धेतला सगळ्यात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या पाचही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं असलं तरी या स्पर्धेत अशा दोन टीम आहेत, ज्यांच्याविरुद्ध भारताला टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळालेला नाही.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला अजूनपर्यंत न्यूझीलंड (India vs New Zealand) आणि श्रीलंकेला (India vs Sri Lanka) पराभूत करता आलेलं नाही. यातली न्यूझीलंडची टीम यावेळी भारताच्याच ग्रुपमध्ये आहे. दुसरीकडे श्रीलंकेची टीम वर्ल्ड कपचा क्वालिफायर राऊंड खेळणार आहे. या राऊंडमधून जर श्रीलंकेची टीम भारताच्या ग्रुपमध्ये आली तर त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्येच खेळावं लागेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत दोनवेळा टी-20 मॅच झाल्या, या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. भारत-न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमधली पहिली मॅच 2007 साली झाली, तर दुसरी आणि अखेरची मॅच 2016 वर्ल्ड कपमध्ये झाली. 2007 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या त्या सामन्यात टीम इंडियाचा 10 रनने पराभव झाला होता. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने एकमेव मॅच गमावली होती, ती न्यूझीलंडविरुद्धच. यानंतर 2016 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम पुन्हा समोरा-समोर आल्या, या सामन्यात भारताला दारूण पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने दिलेल्या 127 रनचा पाठलाग करताना भारताचा फक्त 79 रनवर ऑल आऊट झाला होता.

दुसरीकडे भारत आणि श्रीलंका यांच्यातही टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन मॅच झाल्या आहेत, या दोन्ही वेळा भारताला पराभव स्वीकारावा लागला. यातला एक सामना 2014 टी-20 वर्ल्ड कप फायनलचा होता. असं असलं तरी भारताचं श्रीलंकेविरुद्धचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 22 टी-20 मॅच झाल्या आहेत, यातल्या 14 मॅच भारताने जिंकल्या आहेत.

टीम इंडियाचं वेळापत्रक

24 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान

31 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड

3 नोव्हेंबर : भारत विरुद्ध अफगानिस्तान

5 नोव्हेंबर : भारत विरुद्ध बी1

8 नोव्हेंबर : भारत विरुद्ध ए2

First published:

Tags: T20 world cup, Team india