मुंबई, 10 ऑगस्ट**:** आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी फलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. टॉप टेन फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव हे एकमेव भारतीय नाव आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम. पण सूर्यकुमारनं या ताज्या क्रमवारीत बाबरलाही मागे टाकलं असतं. पण रोहित शर्माच्या एका निर्णयामुळे सूर्याची नंबर वन होण्याची संधी हुकली. अखेरच्या टी20त सूर्याला विश्रांती रोहित शर्मानं फ्लोरिडातली चौथी टी20 जिंकून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. त्यामुळे पाचव्या सामन्यात रोहितनं स्वत: माघार घेत हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवलं. पण त्याचबरोबर त्यानं सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतलाही विश्रांती दिली. याच कारणामुळे या सामन्यात न खेळल्यानं सूर्यकुमार यादव रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावरच राहिला. टी20त टॉप 5 फलंदाज बाबर आझम – 818 (पाकिस्तान) सूर्यकुमार यादव – 805 (भारत) मोहम्मद रिझवान – 794 (पाकिस्तान) एडन मारक्रम – 792 (दक्षिण आफ्रिका) डेव्हिड मलान – 731 (इंग्लंड) हेही वाचा - FIFA WC2022: फिफा विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता, पाहा काय आहे कारण? सूर्याला नंबर वन होण्याची संधी सध्या सूर्यकुमार नंबर दोनवर असला तरी नंबर वन होण्याची संधी दूर नाही. कारण आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हेच दोन संघ सुरुवातीला आमनेसामने येत आहेत. त्यामुळे सूर्यकुमार वि. बाबर आझम असा सामना लवकच रंगणार आहे. आशिया चषकातली या दोघांची कामगिरी नंबर वन कोण हे ठरवण्यास पुरेशी ठरेल. सूर्या सुसाट**…** सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी फार उशीरा मिळाली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तो आपला पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण तेव्हापासून आतापर्यंत त्यानं आपल्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघातलं आपलं स्थान पक्क केलंय. आतापर्यंत 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये सूर्यानं 672 धावा ठोकल्या आहेत. त्यात 5 अर्धशतकं आणि एका शतकाचाही समावेश आहे. टी20तली त्याची सरासरी आहे 37.33
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.