मुंबई, 10 ऑगस्ट**:** येत्या वर्षअखेरीस कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचं फिफानं आधीच जाहीर केलं होतं. पण या वेळापत्रकात बदल केला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ही स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. FIFA आणि इतर सदस्य फुटबॉल संस्थांच्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल. यजमान कतारचा सलामीला सामना**?** ठरलेल्या वेळेनुसार 21 नोव्हेंबरला सेनेगल वि. नेदरलँड या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण फिफा त्यात बदल करुन यजमान कतार आणि इक्वेडोर हा सामना 20 नोव्हेंबरला खेळवण्याचा विचार करत आहे. फिफाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. कतार आणि दक्षिण अमेरिकी फुटबॉल संघटनेनं याला समर्थन दिलं आहे. उभय संघातला हा सामना आधी 21 नोव्हेंबरच्या रात्री होणार होता. 26 खेळाडूंच्या संघाला परवानगी फिफानं विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर याआधी जूनच्या अखेरीस एक मोठा निर्णय घेतला होता. कोरोना संकटामुळे संघातील खेळाडूंची संख्या वाढवण्याचा निर्णय फिफानं घेतला होता. स्पर्धेत सहभाही संघांना 23 खेळाडूंच्या समावेशाची परवानगी देण्यात आली होती. पण आता कोरोनामुळे ही संघात 26 खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. फिफाच्या या निर्णयामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना फायदा होणार आहे. हेही वाचा - Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची ‘फॅमिली’ वाढली, दोन नवे संघ लवकरच मैदानात तिकीटांची मोठी मागणी फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच आखाती देशात ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे चाहत्यांकडून तिकीटांसाठी मोठी मागणी आहे. एका रिपोर्टनुसार विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी तब्बल 30 लाख अर्ज आले आहेत. तर 26 नोव्हेंबरवा होणाऱ्या अर्जेन्टिना आणि मेक्सिकोमधला सामना 25 लाख लोकांना पाहायचा आहे. पण लुसेल स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 80 हजार इतकी आहे. वाढत्या मागणीमुळे 2018 च्या तुलनेत तिकीटांच्या किमतीत तब्बल 46 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल लायनल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासाठी कदाचित हा अखेरचा वर्ल्ड कप असेल. त्यामुळे विश्वचषकात त्यांना खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममधील गर्दी आणखी वाढणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.