• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • कोरोनामध्येही 'हा' देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव

कोरोनामध्येही 'हा' देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव

जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.

जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.

लॉकडाऊन वाढवल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलली आहे. मात्र आता एका देशाने आयपीएलचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2020 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. दरम्यान, श्रीलंकेत आयपीएल 2020 आयोजित करण्याचा प्रस्ताव आता बीसीसीआयकडे आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (एसएलसी) शम्मी सिल्व्हा यांनी असा प्रस्ताव पाठविला की, त्यांचे बोर्ड बीसीसीआयला आयपीएल 2020 आयोजित करण्यासाठी संपूर्ण सुविधा देण्यास तयार आहे. श्रीलंकेत कोरोना विषाणूची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत आणि येथे केवळ 7 लोक मरण पावले आहेत. भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाडू आणि लोकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, प्रसारक, प्रायोजक आणि सर्व संबंधित संघटनांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की जेव्हा परिस्थिती सुरक्षित असेल तेव्हाच आयपीएलचा हा हंगाम खेळला जाईल. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत राहू. यानंतर लगेच एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी श्रीलंकेत आयपीएल 2020 आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला. वाचा-लॉकडाऊनचा IPLलाही फटका, अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली स्पर्धा शम्मी सिल्वा यांनी, आयपीएल 2020 रद्द केल्यास बीसीसीआय आणि त्याचे भागधारकांचे हजारो कोटींचे नुकसान होईल. परिणामी, बीसीसीआयने ते 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत ठेवल्यामुळे ते रद्द करण्याऐवजी ते दुसर्‍या देशात आयोजित करणे फायद्याचे ठरेल, असे सांगितले. या प्रकरणात अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही माहिती आलेली नाही. यासाठी आधी श्रीलंकेतील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे. वाचा-...तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन बीसीसीआयसाठी सोपा नाही मार्ग श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएल 2020 आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी, बीसीसीआयला ते स्वीकारणे आता सोपे होणार नाही. बीसीसीआय कोरोना विषाणूच्या साथीमुळे क्रीडापटू आणि लोकांचे जीवन धोक्यात घालण्यास तयार नसेल. सध्या बर्‍याच देशांमध्ये प्रवासी निर्बंध घातले गेले आहेत, त्यामुळे खेळाडूंची उपलब्धता अवघड होईल. परिस्थिती सुधारल्यानंतरच यावर काही निर्णय घेतला जाईल. वाचा-क्रिकेट चाहत्यांना सगळ्यात मोठा धक्का, कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप होणार रद्द?
    Published by:Priyanka Gawde
    First published: