मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /क्रिकेट चाहत्यांना सगळ्यात मोठा धक्का, कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप होणार रद्द?

क्रिकेट चाहत्यांना सगळ्यात मोठा धक्का, कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप होणार रद्द?

दुबई, 14 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे जगात थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. याचा परिणाम थेट आयपीएलवर होऊ शकतो. सर्वात मोठी क्रिकेट लीग रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची घोषणा कधीही होऊ शकते. मात्र आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपवरही कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप होणार की नाही, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी -20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र कोरोना विषाणूचा भयंकर उद्रेकामुळे आयोजकही घाबरले आहे. जुलै ते ऑगस्टपर्यंतचे सर्व क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या जगभरातील 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं कोरोनाचा संपूर्ण विनाश होण्यासाठी तब्बल 5-6 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरही सर्व देशांमधील परिस्थिती पुर्वपदावर येईल असे नाही.

वाचा-लॉकडाऊनमुळे क्रिकेटला मिस करताय? मग हे फोटो एकदा पाहाच

याआधी विम्बल्डन स्पर्धा यावर्षी 29 जून ते 12 जुलै दरम्यान खेळली जाणार होती, ती रद्द करण्यात आली. यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन 2021मध्ये होणार आहे.

अशा वातावरणात आयसीसीला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपबद्दलही चिंतेत आहे. याआधी आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती सुधारेल असा आमचा विश्वास आहे, असे मत व्यक्त केले होते. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात होणार आहे. विश्वचषकपूर्व पात्रता सामना 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सुरू होईल.

वाचा-चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, IPLचे आयोजन होणार; BCCIने तयार केला प्लॅन

जुलैनंतर आयपीएलबाबत निर्णय होणार?

सीएनबीसी टीव्ही-18ला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै अखेरीस रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकते. यासाठी बीसीसीआयच्या वतीने तारखा शोधण्याचे काम सुरू आहे. यानुसार जुलै किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला 7 हजार कोटी ते 47 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Cricket, T20 world cup