जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / गुजरात विरुद्ध हैदराबाद मॅच पाहण्यासाठी पोहचली, Splitsvilla स्टार, व्हायरल होतायत PHOTO

गुजरात विरुद्ध हैदराबाद मॅच पाहण्यासाठी पोहचली, Splitsvilla स्टार, व्हायरल होतायत PHOTO

Splitsvilla

Splitsvilla

आयपीएल 2022 मधला (IPL 2022) सगळ्यात रोमांचक सामना गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Gujarat Titans vs SRH) यांच्यात झाला. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 35 रनची गरज असताना गुजरातने हैदराबादवर हा रोमांचक विजय मिळवला. गुजरातच्या या विजयासह क्रिकेट जगतात नव्या मिस्ट्री गर्लचीदेखील चर्चा रंगली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल: आयपीएल 2022 मधला (IPL 2022) सगळ्यात रोमांचक सामना गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Gujarat Titans vs SRH) यांच्यात झाला. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 35 रनची गरज असताना गुजरातने हैदराबादवर हा रोमांचक विजय मिळवला. गुजरातच्या या विजयासह क्रिकेट जगतात नव्या मिस्ट्री गर्लचीदेखील चर्चा रंगली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 27 एप्रिल रोजी सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात प्रचंड जल्लोष होता, यावेळी प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान, टीव्ही स्क्रीनवर एका मिस्ट्री गर्लची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा रंजक सामना पाहण्यासाठी रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला फेम स्टार कॅट क्रिस्टियन आणि अवंतिका शर्माही आली होती. दोन्ही स्टार्स गुजरात टायटन्सला सपोर्ट करताना दिसले. दोघांनाही सामन्यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले. IPL 2022 : … म्हणून गुजरात टायटन्स टॉपवर! वाचा हार्दिकच्या टीमच्या विजयाचे रहस्य यानंतर दोघींचे फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झाले. आयपीएलच्या या मिस्ट्री गर्ल्सबद्दल चाहत्यांना सतत जाणून घ्यायचे होते. दोन्ही स्टार रिअॅलिटी शो स्प्लिट्सविलाच्या सीझन 13 मध्ये दिसल्या होत्या.

जाहिरात

अभिनयासोबतच या दोघी स्टार मॉडेलिंगही करतात. अवंतिका शुक्लाचे इन्स्टाग्रामवर 2.38 लाख फॉलोअर्स आहेत, तर कॅटचे ​​8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कॅट आणि अवंतिकानेही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सामन्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत अनेक मिस्ट्री गर्ल्स व्हायरल झाल्या आहेत, मग तो पहिला सामना असो किंवा चेन्नई सामन्यादरम्यान व्हायरल झालेल्या सीएसके मुलीची प्रतिक्रिया. अखेरच्या ओव्हरला हैदराबादला विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा राशिद खानने त्याच्या जुन्या टीमचा बदला घेतला. मार्को जेनसनच्या पहिल्या बॉलला सिक्स मारल्यानंतर तेवातियाने दुसऱ्या बॉलला एक रन काढून राशिद खानला स्ट्राईक दिला. यानंतर राशिदने तिसऱ्या आणि पाचव्या बॉलला सिक्स मारली, त्यामुळे गुजरातला अखेरच्या बॉलवर विजयासाठी 3 रन हवे होते, यानंतर अखेरच्या बॉलवर राशिदने पुन्हा एक सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरला विजयासाठी 22 रन हवे असताना गुजरातने 25 रन काढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात