मुंबई, 2 मे: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 13 रननं पराभव केला. अशातच विजयानंतर धोनीने आयपीएल भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. टॉसदरम्यान धोनीला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये त्याच्या आयपीएल भविष्याबाबतही होता. धोनीला तु पुढील वर्षी पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार का असा सवाल करण्यात आला. यावर धोनीने हसत हसत उत्तर दिले. नक्कीच, तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पाहाल, पण ही असेल किंवा दुसरी याबद्दल काही सांगू शकत नाही. असे संभ्रमात टाकणारे उत्तर धोनीने यावेळी दिले. महेंद्रसिंग धोनीच्या या विधानावरून अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत, कारण 40 वर्षीय एमएस धोनीबद्दल असा अंदाज बांधला जात होता की हा त्याचा शेवटचा सीझन असू शकतो. त्यामुळेच त्याने कर्णधारपदही सोडले होते, पण संघाची स्थिती खराब झाली असता एमएस धोनीला पुन्हा कर्णधारपद सांभाळावे लागले. IPL 2022 : ‘सर्व स्पून फीडिंग शक्य नाही’ धोनीनं जाहीरपणे सांगितली जडेजाची चूक महेंद्रसिंग धोनीच्या या विधानाकडे अनेक अँगलने पाहिले जात आहे. कारण तो पिवळ्या जर्सीत दिसणार आहे, असे तो म्हणाला, परंतु तो खेळाडू की मार्गदर्शक असेल यावर सस्पेन्स कायम आहे.
"You will definitely see me in Yellow jersey!" 🦁😍#THA7A #SRHvsCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 1, 2022
चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम चांगला गेला नाही. सीएसकेने आतापर्यंत त्यांच्या 9 पैकी 6 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन जिंकले आहेत. आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीमने पुन्हा एकदा धोनीला कर्णधार केलं. यानंतरच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेला यश मिळालं. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे.