जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'सर्व स्पून फीडिंग शक्य नाही' धोनीनं जाहीरपणे सांगितली जडेजाची चूक

IPL 2022 : 'सर्व स्पून फीडिंग शक्य नाही' धोनीनं जाहीरपणे सांगितली जडेजाची चूक

IPL 2022 : 'सर्व स्पून फीडिंग शक्य नाही' धोनीनं जाहीरपणे सांगितली जडेजाची चूक

रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनीनं त्यानं पुन्हा कॅप्टन होण्यामागील कारण सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 मे : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती.  पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनीनं त्यानं पुन्हा कॅप्टन होण्यामागील कारण सांगितलं आहे. धोनी यावेळी म्हणाला, ‘जडेजाला मागच्या सिझनमध्येच तो यंदा कॅप्टन होणार हे माहिती होतं. त्याच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ होता. मी पहिल्या 2 मॅचमध्ये जडेजाला मदत केली. त्यानंतर कुणी कोणत्या साईडनं बॉलिंग करायची, तसंच अन्य सर्व निर्णय मी त्याच्यावर सोपवले. तो फक्त टॉससाठी कॅप्टन असावा असं मला वाटत नाही. स्पून फिडिंग (एखादी गोष्ट सतत समजावणे) केल्यानं कॅप्टनला मदत होत नाही. मैदानावर त्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. त्याची जबाबदारी त्यानंच घेणं आवश्यक आहे. एकदा कॅप्टन झाल्यावर अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. त्यामध्ये स्वत:च्या खेळाचाही समावेश असतो. माझ्या मते कॅप्टनसीचा त्याच्या तयारीवर परिणाम झाला. त्याची बॅटींग आणि बॉलिंग पूर्वीच्या पद्धतीनं होत नव्हती. आम्ही डिप मिडविकेटला आम्ही एक चांगल्या फिल्डरलाही मिस करत होतो. आम्ही या सिझनमध्ये 17 ते 18 कॅच सोडल्या आहेत. हा काळजीचा विषय आहे. आम्ही लवकरच यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. ’ असे धोनीनं यावेळी स्पष्ट केले. आयपीएलच्या या सामन्याआधी रवींद्र जडेजाने सीएसकेची कॅप्टन्सी सोडली होती, त्यामुळे टीमने पुन्हा एकदा धोनीला कर्णधार केलं. यानंतरच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेला यश मिळालं. यंदाच्या आयपीएलमधला 9 मॅचमधला सीएकेचा हा तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे. IPL 2022 : ऋतुराजचं शतक एक रनने हुकलं, होम ग्राऊंडवर बेस्ट बॉलिंगलाच धुतलं! सनरायजर्स हैदराबादने यंदा 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 10 पॉईंट्ससह हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात