मुंबई, 24 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनमध्ये शुक्रवारी 3 सामने होणार आहेत. यामधील यू मुंबा (U Mumba) च्या लढतीकडं मराठी फॅन्सचं विशेष लक्ष असेल. यू मुंबानं पहिल्या मॅचमध्ये बंगुळुरू बुल्सचा (Bengaluru Bulls) पराभव केला होता. आता दबंग दिल्ली (Dabang Delhi KC) विरुद्ध त्यांची लढत होणार आहे. दिल्लीनं पहिल्या मॅचमध्ये पुणेरी पलटणचा (Puneri Paltan) पराभव केला होता.
शुक्रवारी होणाऱ्या अन्य एका सामन्यात गतविजेता बंगाल वॉरियर्सची लढत गुजरात जायंट्सशी होणार आहे. या दोन्ही टीमनी पहिला सामना जिंकत स्पर्धेची दमदार सुरूवात केली आहे. तर आजची तिसरी लढत तामिळ थलायवाज आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. या दोन्ही टीमना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. तामिळ थलायवाजची पहिली लढत बरोबरीत सुटली होता. तर, बुधवारी झालेल्या मॅचमध्ये बंगळुरूचा यू मुंबाने पराभव केला होता. शुक्रवारी होणाऱ्या लढती कधी आणि कुठे पाहता येतील ते पाहूया
PKL 8 मध्ये 24 डिसेबरला किती सामने आहेत?
पीकेएल-8 मध्ये 23 डिसेंबर रोजी 3 सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्लीमध्ये होईल. दुसरा सामना तामिळ थलयवाज आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. तर शेवटची लढत बंगला वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात रंगेल.
PKL 8 मधील आजचे सामने कधी सुरू होतील?
आज तीन सामने आहेत. पहिला सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दुसरा त्यानंतर बरोबर एक तासांनी सुरू होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे.
PKL 8 मधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारतामध्ये या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहता येणार आहे.
PKL 8 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
डिस्नी+हॉटस्टार ऍप आणि वेबसाईट कबड्डी मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league