Home /News /sport /

Pro Kabaddi League : 74 लाखांचा खेळाडू गुजरातचे स्वप्न पूर्ण करणार का?

Pro Kabaddi League : 74 लाखांचा खेळाडू गुजरातचे स्वप्न पूर्ण करणार का?

प्रो कबड्डीचा लीगचा (Pro Kabaddi League) आठवा सिझन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सिझनमध्ये गुजरात जायंट्सची टीम (Gujarat Giants) अनुभवी खेळाडूंसह उतरणार आहे.

    मुंबई, 20 डिसेंबर : प्रो कबड्डीचा लीगचा (Pro Kabaddi League) आठवा सिझन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सर्व सामने हे बंगळुरूतच होणार आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी ही स्पर्धा झाली नाही. तर 2019 मध्ये बंगाल वॉरियर्सनं विजेतेपद पटकावले होते. या सिझनमध्ये गुजरात जायंट्सची टीम (Gujarat Giants) मजबूत बनली आहे. या टीमला दोन वेळा विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे. त्यामुळे गुजरातने पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी काही मोठे बदल केले आहेत. गुजरातचा 2017 साली पाटणा पायरेट्सनं फायनलमध्ये पराभव केला होता. तर 2018 साली अगदी अटीतटीच्या फायनलमध्ये  बंगळुरू बुल्सनं त्यांना हरवले. 2019 साली गुजरातला सूर गवसलाच नाही. या टीमचा 9 व्या क्रमांकावर घसरण झाली. यंदा गुजरातनं काही अनुभवी खेळाडूचा टीममध्ये समावेश केला असून असून नव्यानं तयारी केली आहे. प्रो कबड्डी लीगचे पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी गुजराची अनुभवी फौज उपयोगी ठरणार आहे. गुजरातनं यंदाच्या लिलावात दबंद दिल्लीचा माजी डिफेंडर रविंदर पहलला (Ravinder Pahal) 74 लाखांची मोठी किंमत गृदेऊन खरेदी केले आहे. रविंदरनं या स्पर्धेत आजवर 112 मॅचमध्ये 340 पॉईंट्स मिळवलेत. यामध्ये 23 हाय फाईव्हचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणेरी पलटनच्या गिरीश एर्नाकलाही गुजरातने 20 लाखांना खरेदी केले आहे. गिरीशकडे 106 मॅचचा अनुभव असून तो लेफ्ट कॉर्नरचा अनुभवी डिफेंडर आहे. मागील सिझनमध्ये गुजरातच्या राईट आणि लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्सनी निराश केले होते. त्यामुळे यंदा त्यांनी अनुभवी डिफेंडर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. Pro Kabaddi League : पुणेरी पलटनचं नशीब यंदा बदलणार का? नव्या कॅप्टनवर मोठी आशा 'डू ऑर डाय' स्पेशालिस्ट महेंद्र गणेश राजपूत या सिझनमध्ये पुनरागमन करणार आहे. तो मागील सिझन खेळला नव्हता. गणेशनं 62 मॅचमध्ये 180 पॉईंट्स घेतले आहेत. युवा रेडर रतन यंदा गुजरातकडून पदार्पण करणार आहे. तर कर्नाचकच्या रतनाही गुजरातने 25 लाखांमध्ये खरेदी केले आहे. सुनील कुमार (Suni Kumar) हा गुजरातच्या टीमचा कॅप्टन आहे. तो बऱ्याच कालावधीपासून या टीमचा सदस्य आहे. सुनीलनं 68 मॅचमध्ये 179 पॉईंट्स कमावले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league, Sports

    पुढील बातम्या