मुंबई, 19 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगमधील (Pro Kabaddi League) महाराष्ट्रातील टीम पुणेरी पलटन यंदा (Puneri Paltan) इतिहास बदलण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. गेल्या सिझनमध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या पलटनला आजवर एकदाही विजेपद मिळवता आलेले नाही. यंदा स्टार रेडर नितीन तोमर (Nitin Tomar) या टीमचा कॅप्टन असून डिफेंडर विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) व्हाईस कॅप्टन आहे.
यंदाच्या प्रो कबड्डी लीगला 22 डिसेंबर रोजी सुरूवात होणार आहे. कोरोनामुळे मागील सिझन होऊ शकला नाही. यंदा सर्व सामने हे बंगळुरूमध्ये होणार आहेत. पुणेरी पलटनची पहिली मॅच 23 तारखेला दबंग दिल्ली विरुद्ध होणार आहे. यंदा मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाही. आजवर 5 टीमनं ही स्पर्धा जिंकली असून पाटणा पायरेट्सनं (Patna Pirates) सर्वात जास्त 3 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
पुणेरी पलटनचा इतिहास
प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात पुणेरी पलटनची कामगिरी आजवर चांगली झालेली नाही. त्यांनी या स्पर्धेत एकूण 128 सामने खेळले असून त्यापैकी 50 मॅच जिंकल्या आहेत. कर 67 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. सिझन 8 पूर्वी झालेल्या लिलावात त्यांनी एकच विदेशी खेळाडू खरेदी केला आहे. व्हिक्टर ओबारियोला 10 लाख रुपये देऊन पलटननं करारबद्ध केलं आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये मोहित गोयल, रविंद्र गुर्जर, पवन कुमार, हादी ताजिक, संकेत सावंत आणि पंकज मोहिते यांचा टीममध्ये समावेश केला आहे.
कॅप्टनकडून आशा
पुणेरी पलटनची सर्व आशा त्यांचा कॅप्टन नितिन तोमरवर आहे. त्याने आजवर 68 मॅचमध्ये 467 पॉईंट्स मिळवले आहेत. तर दुसरिकडं डिफेंडर विशाल भारद्धवाजनं 60 मॅचमध्ये 201 पॉईंट्सची कमाई केली आहे. मागील सिझनमध्ये सुरजित सिंह टीमचा कॅप्टन होता. पण, तो यंदा या टीमचा सदस्य नाही.
प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटनचे प्रदर्शन
पहिला सिझन - आठवा क्रमांक
दुसरा सिझन - आठवा क्रमांक
तिसरा सिझन - तिसरा क्रमांक
चौथा सिझन - चौथा क्रमांक
पाचवा सिझन - झोन ए मध्ये दुसरा क्रमांक
सहावा सिझन - झोन ए मध्ये चौथा क्रमांक
सातवा सिझन - दहावा क्रमांक
Pro Kabaddi League : अनेक टीमनी बदलले कॅप्टन! पाहा 8 व्या मोसमाची संपूर्ण यादी
पुणेरी पलटनची टीम
रेडर: नितिन तोमर, मोहीत गोयत, पंकज मोहीत, राहुल चौधरी, पवन कुमार, विश्वास
डिफेंडर: अबिनेष नदराजन, बाळासाहेब जाधव, बलदेव सिंह हादी ताजिक, सौरभ कुमार, संकेत कुमार, कर्मवीर, सोमबीर, विशाल भारद्वाज
ऑलराउंडर्स: ई सुभाष, गोविंद गुर्जर, विक्टर ओबरियो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league