मुंबई, 22 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगमधील (Pro Kabaddi League) पहिल्या मॅचला आता काही तासांचा कालावधी उरला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धेतील सर्व सामने हे बंगळुरूमध्ये होणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच फॅन्सच्या अनुपस्थितीमध्ये हे सामने होणार आहेत. आजवर 5 टीमनं ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेसाठी टीम, खेळाडू आणि मॅच बाबत खास नियम तयार करण्यात आले आहेत. प्रो कबड्डील लीगची मजा अनुभवण्यासाठी हे नियम समजून घेणे आवश्यक आहे. एका टीममध्ये किती खेळाडू? मॅचच्या दिवशी प्रत्येक टीममध्ये किमान 10 आणि कमाल 12 खेळाडू असू शकतात. यामध्ये एक विदेशी खेळाडू आवश्यक आहे. यामधील मैदानात फक्त 7 खेळाडू उतरतात. तर अन्य खेळाडू राखीव असतात. मॅचचा कालावधी किती? एका मॅचचा कालावधी 40 मिनिटांचा असतो. 20-20 मिनिटांच्या दोन हाफमध्ये मॅचची विभागणी होते. हाफ टाईममध्ये 5 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. या ब्रेकनंतर दोन्ही टीमची साईड बदलते. स्कोअरिंग पद्धत काय आहे? विरोधी टीमचा प्रत्येक खेळाडू आऊट केल्यानंतर एक पॉईंट मिळतो. ऑल आऊट केल्यानंतर 2 बोनस पॉईंटची कमाई होते. 3 किंवा कमी खेळाडू असताना रेडरला आऊट केल्यास डिफेंडिंग टीमला बोनस पॉईंट दिला जातो. टाईम आऊट कधी? मॅचच्या दरम्यान दोन्ही टीम 90 सेकंदाचा टाईम आऊट घेऊ शकतात. टाईम आऊट हा कोच, कॅप्टन किंवा कोणताही खेळाडू रेफ्रीच्या परवानगीने घेऊ शकतो. त्यावेळी मॅच थांबवली जाते. त्यानंततर पुन्हा जिथं मॅच थांबली आहे त्याच ठिकाणी ती पुन्हा सुरू होते. एखादा खेळाडू जखमी झाला तर मॅच रेफ्री किंवा ऑफिशियल टाईम आऊट घेतात. हा टाईम आऊट दोन्ही टीमच्या टाईम आऊटपेक्षा वेगळा असतो. Pro Kabaddi League : पुणेरी पलटनचं नशीब यंदा बदलणार का? नव्या कॅप्टनवर मोठी आशा राखीव खेळाडू प्रत्येक टीमला मॅचच्या दरम्यान 5 खेळाडू राखीव म्हणून घेण्याची परवानगी आहे. राखीव खेळाडूंना मॅचमध्ये उतरवण्यासाठी कॅप्टनला रेफ्रीची परवानगी घ्यावी लागते. आऊट झालेल्या किंवा निलंबित खेळाडूच्या जागेवर राखीव खेळाडूचा समावेश करता येत नाही. बोनस पॉईंट रेडरनं बोनस लाईन ओलांडली तर त्याला बोनस पॉईंट मिळतो. पण, रेडरला क्रॉस लाईनपूर्वीच पकडले तर प्रतिस्पर्धी टीमला एका पॉईंटची कमाई होते. Pro Kabaddi League : पहिल्याच दिवशी इतिहासातला महागडा खेळाडू मैदानात, असं आहे रेकॉर्ड! मॅचचा निकाल पूर्ण मॅचमध्ये जास्त पॉईंट्स घेणाऱ्या टीमला विजयी घोषित केले जाते. तर मॅचमध्ये सर्वात जास्त पॉईंट्सची कमाई केलेल्या खेळाडूला रेडर म्हणून घोषित केले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.