मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pro Kabaddi League : पहिल्याच दिवशी इतिहासातला महागडा खेळाडू मैदानात, असं आहे रेकॉर्ड!

Pro Kabaddi League : पहिल्याच दिवशी इतिहासातला महागडा खेळाडू मैदानात, असं आहे रेकॉर्ड!

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे हा मोसम बायो-बबलमध्ये, प्रेक्षकांशिवाय आणि एकाच ठिकाी खेळवण्यात येणार आहे.

  • Published by:  Shreyas

बैंगलुरू, 21 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे हा मोसम बायो-बबलमध्ये, प्रेक्षकांशिवाय आणि एकाच ठिकाी खेळवण्यात येणार आहे. 12 टीमचा सहभाग असलेल्या या स्पर्धची सुरूवात माजी चॅम्पियन यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यातल्या सामन्याने होणार आहे. तर दुसरा मुकाबला तेलुगू टायटन्स (Telugu Titans) आणि तामीळ थलायवाज यांच्यात आणि तिसरा सामना यूपी योद्धा आणि गतविजेत्या बंगाल वॉरियर्सशी होईल. या मोसमात सुरुवातीचे चार दिवस आणि मग प्रत्येक शनिवारी तीन-तीन सामने होतील.

सातव्या मोसमातला सर्वाधिक स्कोरर पवन कुमार सेहरावत बैंगलुरू बूल्सला (Bengaluru Bulls) युवा खेळाडूंनी सजलेल्या यू मुंबाविरुद्ध (U Mumba) चांगली सुरूवात द्यायच्या प्रयत्नात असेल. सेहरावतने मागच्या मोसमात 346 पॉईंट्स केले होते. यू मुंबाच्या अपेक्षा फजल अत्राचलीच्या नेतृत्वात डिफेन्सने उत्कृष्ट कामगिरी करण्यावर असेल. मागच्या मोसमात त्याने टॅकलमधून 82 पॉईंट्स मिळवले होते. रेडर अभिषेक आणि अजितची युवा जोडीही विरोधी टीमचा अनुभवी डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न करेल. एकूण रेकॉर्ड बघितलं तर यू मुंबा 10-4 ने पुढे आहे.

तेलुगू टायटन्सचं पारडं जड

दुसऱ्या सामन्यामध्ये तेलुगू टायटन्सच्या अपेक्षा सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमारच्या अनुभवी रेडिंग जोडीवर असतील. तामीळ थलायवाजच्या (Tamil Thalaivas) डिफेन्समध्ये त्यांच्यासमोर ब्लॉक मास्टर सुरजीत असेल. सुरजीतकडे पीकीएलच्या इतिहासात सगळ्यात यशस्वी 116 ब्लॉक आहेत. यानंतर युवा खेळाडू मंजीतही त्याचा खेळ दाखवण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही टीमचं रेकॉर्ड बघितलं तर टायटन्स 5-3 ने आघाडीवर आहेत.

गतविजेत्या चॅम्पियनसमोर यूपीचं आव्हान

गतविजेत्या बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) त्यांच्या अभियानाची सुरुवात यूपी योद्धाच्या (Up Yoddha) मजबूत टीमविरुद्ध करेल. यूपीची टीम पाचव्या मोसमात लीगमध्ये सामील झाली, यानंतर प्रत्येक वेळा त्यांनी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. यावेळी टीमने सर्वाधिक मागणी असणाऱ्या रेडर प्रदीप नरवालला (Pardeep Narwal) टीममध्ये घेतलं आहे. यूपीने त्याला तब्बल 1.65 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतलं. प्रदीप नरवालला पीकेएलच्या इतिहासाली सगळ्यात मोठी रक्कम मिळाली आहे. रेकॉर्डमध्ये बंगालची टीम 3-2 ने आघाडीवर आहे, तर तीन सामने टाय झाले.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league