केप टाऊन, 25 मार्च : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाचा धोक दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका फक्त सामन्यांना नाही तर बॉलिवूड आणि क्रीडा विश्वालाही बसला आहे. यातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायिक कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. कनिका एका पार्टीत उपस्थित होती. त्यामुळं तिच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र आता कनिकामुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ अडचणीत आला आहे.
कनिका लखनऊमध्ये एका पार्टीमध्ये उपस्थित होती. या पार्टीत अनेक राजकीय नेते मंडळीही सामिल होता. मात्र कनिका ज्या हॉटेलमध्ये स्थायिक होती, तेथेच आफ्रिकेचा संघही होता. त्यामुळं त्यांना आता दुसऱ्यांदा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. आता कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चिंता वाढली आहे.
वाचा-लाला हाथ तो मिला लेते! कोरोनाला रोखण्यासाठी पठाण बंधूंची फिल्मी स्टाईल
याआधी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे ही मालिका रद्द झाली. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मायदेशी परतला. सध्या कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत.
बॉलिवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आढळून आल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. ती कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र जबरदस्त हंगामा झाला होता. कारण कनिका काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. असंही बोललं जातं की कनिका कपूर लंडनवरून परतल्यानंतर विमानतळावर स्क्रिनींग केलं नव्हतं. मात्र कनिका कपूरने हे आरोप फेटाळले आहेत. सध्या कनिका कपूरवर उपचार सुरू आहेत.
वाचा-VIDEO: 5 वर्षांच्या लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्रिकेटपटूची धडपडआत्महत्या करणार होती कनिका
घटस्फोट झाल्यानंतर कनिका भारतात परतली, मात्र या काळ तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, तिला आयुष्य संपवावं असं देखील वाटत होतं. कनिका म्हणाली की, ‘असं तेव्हा होतं, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात. एका वाईट काळातून तुम्ही जात असता, त्यातच वकील पैसे मागत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला 3 मुलं आहेत, ज्यांना शाळेतून काढून टाकलं आहे कारण तुम्ही त्यांच्या फी नाही भरल्या आहेत.’ ती पुढे म्हणाली की, ‘ मी तक्रार नाही करत आहे. पण जेव्हा मी हार पत्करण्याच्या वाटेवर होते, तेव्हा मला देवाने ‘बेबी डॉल’ गाण्याची संधी मिळाली. तेव्हा मात्र माझ्याकडे कोणतही हार मानण्याचे कारण नव्हतं.’
वाचा-'जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळेन', भारतीय खेळाडूनं व्यक्त केल्या भावना
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.