अॅडलेड, 06 नोव्हेंबर: रविवारची सकाळ अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठा धक्का देणारी ठरली. कारण टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेसारख्या टीमला नेदरलँडनं धक्का देत 13 धावांनी पराभूत केलं. पण या पराभवानं ग्रुप 2 च्या पॉईंट टेबलमध्ये मात्र मोठा उलटफेर केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं यंदाच्या वर्ल्ड कपमधलं आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात आलं. पण ही बाब टीम इंडियाच्या पथ्थ्यावर पडली आहे. कारण भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धची मॅच खेळण्याआधीच सेमी फायनलचं तिकीट मिळालं आहे. पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर दक्षिण आफ्रिका या सामन्याआधी 5 पॉईंटसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर होती. तर टीम इंडिया 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर. त्यामुळे टीम इंडिया आता थेट सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. पण तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश संघांचे 4-4 पॉईंट्स आहेत. त्यामुळे या दोन्ही संघातला विजेता संघ आता सेमी फायनल गाठणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे ग्रुप 2 मधलं समीकरणच बदलून गेलं आहे.
India go through!
— ICC (@ICC) November 6, 2022
The Netherlands' thrilling victory over South Africa means India have officially qualified for the semi-finals 💥 pic.twitter.com/RH7380jgAn
नेदरलँडचा जोरदार पंच नेदरलँडला हरवून सेमी फायनल गाठण्याच्या निर्धारानं आज दक्षिण आफ्रिचा संघ मैदानात उतरला होता. भारतासारख्या टीमला हरवल्यामुळे दक्षिण आफ्रिका या मॅचमध्ये हॉट फेव्हरेट मानली जात होती. पण नेदरलँडनं दिलेलं 158 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलं नाही आणि त्याना अवघ्या 145 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकन संघासाठी हा मोठा धक्का आहे. कारण यंदा दक्षिण आफ्रिकेला विजेतेपदाचे दावेदार मानलं जात होतं. पण त्यांचा वर्ल्ड कपमधला प्रवास सुपर 12 फेरीतूनच धक्कादायकरित्या संपुष्टात आला. हेही वाचा - T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, पाकिस्तानचा मार्ग साफ; वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर टीम इंडियाला दिलासा दरम्यान भारतीय संघ आता निर्धास्तपणे सुपर 12 फेरीतल्या अखेरच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना जिंकल्यास टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी राहिल. त्यामुळे 9 नोव्हेंबरला सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना होईल.