मुंबई, 15 फेब्रुवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची आजही क्रिकेट विश्वातील दिग्गज म्हणून ओळख आहे. दोन्ही खेळाडूंनी अनेकवेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर या दोघांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेचा विषय असतात. आता मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिग्गज फलंदाज बल्लेबाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावरमुळे चर्चेत असतात. सचिन सध्या बुशफायर लीग स्पर्धेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात आहे. त्यावेळी सचिनेने पोस्ट केलेल्या एका फोटोवर गांगुलीचे एक मजेदार कमेंट केली आहे. वाचा- अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO
वाचा- IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ ‘तुझं नशीब चांगलं आहे’ सचिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यात सचिन सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोवर ‘उन्हाचा आनंद घेताना’, असे सचिनने कॅप्शन दिले आहे. यावर सौरव गांगुलीने सचिनची मस्करी करत जळत असल्याची कमेंट केली. गांगुलीने या फोटोवर तुझं नशीब चांगलं आहे, मस्त सुट्ट्यांचा आनंद घे…’, अशी मजेदार कमेंट केली.
वाचा- कसोटीमध्येही टीम इंडियाचं काही खरं नाही! 3 सलामीवीरांनी मिळून काढला 1 रन 6 वर्षांनंतर सचिन तेंडुलकरने केली फलंदाजी ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या लोकांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू अलिस पॅरीविरुद्ध शॉट्स खेळत असताना सचिनने गेल्या रविवारी जवळपास सहा वर्षानंतर फलंदाजी केली होती. सामन्यानंतर सचिनने फलंदाजी करताना खूप चिंताग्रस्त असल्याचेही सांगितले.

)







