कसोटीमध्येही टीम इंडियाचं काही खरं नाही! 3 सलामीवीरांनी मिळून काढला 1 रन

कसोटीमध्येही टीम इंडियाचं काही खरं नाही! 3 सलामीवीरांनी मिळून काढला 1 रन

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत क्लीन स्विप मिळाल्यानंतर भारतीय संघ आता कसोटीमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 15 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत क्लीन स्विप मिळाल्यानंतर भारतीय संघ आता कसोटीमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध भारतीय संघाचा सराव सामना होत आहे. या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारताच्या युवा सलामीवीरांच्या तांत्रिक चुका दिसून आल्या. त्यामुळं कसोटीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भारताला अनुभवी फलंदाजांची गरज आहे.

पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केवळ एका धावाची भागीदारी केली. त्यानंतर भारताच्या सर्वात जास्त अपेक्षा असलेला शुभमन गिलही भोपळा न फोडता बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारीने शानदार शतकी खेळीनं करत भारतीय डाव सावरला. शतक झळकावल्यानंतर हनुमानाने शुक्रवारी सांगितले की, जर टीम मॅनेजमेंटने सांगितले तर तो डाव सुरू करण्यास तयार आहे. सराव सामन्यात सहाव्या क्रमांकावर पोहोचलेल्या विहारीने शतकी खेळी केली पण मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल लवकर बाद झाले.

वाचा-VIDEO : विकेट मिळाल्याचा असा आनंद कधीच पाहिला नसेल, गोलंदाजाचा जल्लोष बघाच

भारताचे तीन मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मुख्य सामन्यांमध्ये नील वेगनर, ट्रेंट बाउल्ट आणि मॅट हेनरी या दिग्गज गोलंदाजांचा सामना हे फलंदाज कसे करतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा-RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, 'लोगो' का काम होता है कहना

संघाची रचना समजून घेणे आवश्यक

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विहारीला सलग चार कसोटी सामन्यांमधून बाहेर काढण्यात आले. यासंदर्भात विहारीने, “बर्‍याच वेळा संघ रचनादेखील समजून घ्यावी लागते. जेव्हा आपण आपल्या मातीवर खेळत आहात आणि पाच गोलंदाज संघात असतील तेव्हा एका फलंदाजास बाहेर रहावे लागेल. मला काही सिद्ध करण्याची गरज नाही, परंतु मी या प्रक्रियेचे अनुसरण करतो”, असे सांगितले.

वाचा-VIDEO : बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात

पृथ्वी शॉ की शुभमन गिल कोणाला मिळणार संधी?

शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ दोघेही खूप हुशार आहेत. त्यामुळं वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी द्यावी, याचा विचार विराटला करावा लागले. सराव सामन्यात दोन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले. सराव सामन्यात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी भारताची ओपनिंग केली. तर, गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.

First Published: Feb 15, 2020 09:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading