स्पोर्ट्स

  • associate partner

IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, 10 वर्षानंतर दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ

IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, 10 वर्षानंतर दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ

2010पासून मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि काही काळ मुख्य प्रशिक्षक असलेला दिग्गज फलंदाज आता युएई क्रिकेट बोर्डाचा प्रमुख होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : भारताचा माजी फलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघासोबत 10 वर्ष काम करत आहे. मात्र अखेर या खेळाडूने मुंबई इंडियन्सची साथ सोडत आता संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. रॉबिन सिंह असे या खेळाडूचे नाव असून स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. वृत्तानुसार, 56 वर्षीय रॉबिनची नियुक्ती डोगी ब्राऊनला मुख्य प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी याच संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. या घटनेनंतर कर्णधार मोहम्मद नावेद यांच्यासह काही ज्येष्ठ खेळाडूंना निलंबित करण्यात आले होते आणि निवड पॅनेलदेखील रद्द करण्यात आले होते. निवड समितीशिवाय ब्राउनला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्कॉटलंड आणि अमेरिकेविरूद्ध आणि जानेवारीत ओमान आणि मस्कॅट विरुद्ध दोन विश्वचषक लीग सामने निवडावे लागले. आता रॉबिन सिंह या संघासोबत जोडले जाणार आहे.

वाचा-RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, 'लोगो' का काम होता है कहना

वाचा-प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला खेळाडू IPL खेळणार नाही

रॉबिन यांनी 1989 ते 2001 दरम्यान भारतासाठी एक कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळले होते आणि गेली अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2013 पासून तो कॅरिबियन प्रीमियर लीगमधील बार्बाडोस ट्रायडर्स आणि टी -10 लीगमधील फ्रँचायझीशी संबंधित आहे.आयपीएलच्या अत्यंत यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स 2010पासून जोडलेले आहे. मुंबई इंडियन्सच्या 4 विजेतेपदामध्ये रॉबिन सिंह यांचा मोठा हात आहे.

वाचा-VIDEO : विकेट मिळाल्याचा असा आनंद कधीच पाहिला नसेल, गोलंदाजाचा जल्लोष बघाच

वाचा-VIDEO : बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात

चपळ क्षेत्ररक्षक आणि फलंदाजीचा अष्टपैलू रॉबिनने एकदिवसीय सामन्यात 25.95 च्या सरासरीने 2 हजार 236 धावा फटकावल्या, त्यातील सर्वोत्तम 100 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 69 विकेट घेतल्या आहेत. तर, 22 धावांत पाच विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

First published: February 15, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading