मुंबई, 25 जानेवारी : भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या बॅटमधून सध्या धावांचा पाऊस पडत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शुभमनने तीन शतके झळकावली. हा पराक्रम करत त्याने बाबर आझमच्या 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुर्मिळ विक्रमाची बरोबरी केली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या मालिकेत भारतीय संघाने तीनही सामने जिंकून न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. या मालिकेत शुभमन गिलला प्लेअर ऑफ द सिरीजने सन्मानित करण्यात आले. गिलने मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंदूरमध्ये अवघ्या 78 चेंडूत 112 धावा करून चौथे एकदिवसीय शतक आणि मालिकेतील दुसरे शतक केले. यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या मालिकेत सलामीवीराने 208 धावांची खेळी करून वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय ठरला आहे. यामालिकेत गिलने एकूण 360 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा : न्यूझीलंडचा धुव्वा! वर्ल्ड कपआधी वनडे रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
2016 मध्ये, बाबर आझमनेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत तीन शतके नोंदवत 360 धावा केल्या होत्या. शुभमनने बाबर आझमच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 2016 पासून बाबर आझमचा हा रेकॉर्ड अबाधित होता परंतु भारताच्या युवा क्रिकेटरने आता त्याच्याशी बरोबरी केली आहे.
गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीची शानदार सुरुवात केली असून त्याने 21 सामन्यांमध्ये 73.76 च्या सरासरीने आणि 109.80 च्या स्ट्राइक रेटने 1254 धावा केल्या आहेत. आणि या तरुणाने मालिकेच्या आधी त्याच्या 19 व्या एकदिवसीय डावात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Shubhman Gill, Team india