मुंबई, 25 जानेवारी : 24 जानेवारी रोजी इंदोर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पारपडला. हा सामना भारताने 90 धावांनी जिंकून मालिका विजय प्राप्त करत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला. न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ सध्या आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंड संघ मागील अनेक दिवसांपासून आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर राज्य करीत होता. परंतु भारतासोबत वनडे मालिकेला सुरुवात झाल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये मोठे उलटफेर पहायला मिळाले. हैद्राबाद येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतसोबतच्या दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये प्रथम स्थानी असलेला न्यूझीलंड संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आणि इंग्लंडने वनडे रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावले.
The new No.1 team in the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings
More https://t.co/sye7IF4Y6f pic.twitter.com/hZq89ZPO31 — ICC (@ICC) January 24, 2023
मंगळवारी 24 जानेवारी रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने 90 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. या वनडे मालिकेतील तीनही सामने जिंकून भारताने 3-0 ने आघाडी घेत मालिका विजय प्राप्त केला. भारताचा फलंदाज शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सिरीजने सन्मानित करण्यात आले. शुभमनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात द्विशतक ठोकले तर तिसऱ्या सामन्यातही शतक ठोकण्यात तो यशस्वी ठरला.
न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका भारताने चांगल्या फरकाने जिंकल्यामुळे भारतीय संघाने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये प्रथम स्थानी झेप घेतली आहे. 5010 पॉईंट सह भारताची रेटिंग ही 114 अशी आहे. तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड, तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया विराजमान आहे. तर कधीकाळी प्रथम स्थानावर राज्यकरणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india