पाकिस्तानने 67 वर्षांत फक्त दोनच हिंदूना क्रिकेट संघात दिली जागा!

पाकिस्तानने 67 वर्षांत फक्त दोनच हिंदूना क्रिकेट संघात दिली जागा!

हिंदू खेळाडू दानिश कनेरियाने याने केलेल्या खुलासानंतर पाकमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा पुन्हा जोर धरत आहे.

  • Share this:

लाहोर, 27 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनं पाककडून खेळणाऱ्या हिंदू खेळाडूंवर भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण गाजले असताना हिंदू खेळाडू दानिश कनेरियाने या सगळ्यात तथ्य असल्याचे मान्य केले होते. दानिश हिंदू असून पाकिस्तान क्रिकेट संघाकडून क्रिकेटही खेळला आहे. मात्र पाकचे खेळाडू माझ्याशी बोलायचेसुद्धा नाहीत. हिंदू आहे म्हणून बोलणं टाळणारे किंवा हिणवणारे यांचे नावही मी आता जाहीर करू शकतो असंही दानिशने म्हटलं.

या सगळ्या प्रकरणानंतर आता हिंदू अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा पुन्हा जोर धरत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी शेअर केला आहे. यामध्ये शोएब अख्तरने सांगितले आहे की, कशा प्रकारे हिंदू असल्याने दानिश कनेरियाला पाकिस्तानचे खेळाडू एकटे पाडतात. तसेच त्याच्यासोबत कसे वागायचे हेदेखील अख्तरने सांगितले आहे. मात्र गेल्या 67 वर्षात फक्त दोनच हिंदू खेळाडू पाकिस्तान संघाकडून खेळले आहेत.

वाचा-पाकमध्ये हिंदू क्रिकेटपटूचा छळ, भाजपने शेअर केला शोएब अख्तरचा VIDEO

हे दोन हिंदू खेळाडू पाककडून खेळले क्रिकेट

पाकिस्ताननं 67 वर्षांपूर्वी पहिला क्रिकेट सामना खेळला. त्या दिवसापासून आतापर्यंत पाकिस्तानकडून केवळ दोन हिंदू खेळाडू खेळले आहेत. दानिश कनेरिया (Danish Kaneria) यांच्याआधी पाकिस्तानकडून अनिल दलपत (Anil Dalpat) हे क्रिकेट खेळले आहेत. अनिल यांचे वडील दलपत हे सोनावारिया क्रिकेटचे चाहते होते आणि कराचीमध्ये (Karachi) एक क्रिकेट क्लबही ते चालवत असत. त्यामुळं घरात क्रिकेटचे वातावरण असल्यामुळं अनिलनेही क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 2 मार्च 1984मध्ये पाकिस्तानकडून अनिलनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अनिल यष्टीरक्षक आणि खालच्या क्रमांकाचा फलदाज होता. मुख्य म्हणजे दानिक कनेरिया हे दलपत यांचे नातलग होते.

वाचा-भारताला मोठा झटका, टोकियो ऑलिम्पिकआधी स्टार बॉक्सरवर एका वर्षाची बंदी

वाचा-अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण

पाकिस्तानकडून 7 बिगर मुसलमान खेळाडू खेळले क्रिकेट

पाककडून आतापर्यंत 7 बिगर मुसलमान खेळाडू क्रिकेट खेळले आहे. वालिस मैथ्यूस पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले बिगर मुसलमान खेळाडू होते. त्यानंतर अँग्लो इंडियन डनकन शार्प आणि एंटाओ डी सोजा पाकिस्तान संघात होते. यूसुफ योहानाने पाकिस्तानकडून क्रिकेट खेळण्यासाठी नंतर इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्याचबरोबर सोहेल फजल सारखे इसाई खेळाडूही पाककडून खेळले आहेत.

वाचा-परप्रांतीय युवकाकडून विवाहितचा विनयभंग, पाठवला लज्जा उत्पन्न करणारा मेसेज

भाजपने शेअर केला शोएब अख्तरचा VIDEO

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर वातावरण तापलं आहे. यात विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी शेअर केला आहे. भाजपचे आयटीसेल प्रमुख मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अख्तर म्हणतो की, मी माझ्या कारकिर्दीत दोन-तीन जणांशी वाद केला. जेव्हा लोक कराची, पेशावर किंवा पंजाबबद्दल बोलायचे तेव्हा मला राग यायचा. जर कोणी हिंदू असेल तर तो खेळेल. त्याच हिंदूने कसोटी मालिका जिंकून दिली. मी म्हटलं आता बोला... सर हा इथून जेवण का घेत आहे? तुला बाहेर उचलून फेकून देईन. देशाला 6-6 विकेट काढून तो देत आहे. मी फेमस झालो असलो तरी मालिका दानिशने जिंकून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या