मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धोनीच्या नेतृत्वाखाली CSKला विजेतेपद जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती

धोनीच्या नेतृत्वाखाली CSKला विजेतेपद जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती

23 वर्ष क्रिकेट खेळूनही टीम इंडियात मिळाली नाही जागा, आता जाहीर केली निवृत्ती.

23 वर्ष क्रिकेट खेळूनही टीम इंडियात मिळाली नाही जागा, आता जाहीर केली निवृत्ती.

23 वर्ष क्रिकेट खेळूनही टीम इंडियात मिळाली नाही जागा, आता जाहीर केली निवृत्ती.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून (CSK) खेळताना चर्चेत आलेल्या फिरकी गोलंदाजानं आज निवृत्ती जाहीर केली. 23 वर्ष स्थानिक क्रिकेट खेळून या क्रिकेटपटूनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. शादाब जकाती असे या खेळाडूचे नाव असून धोनीच्या नेतृत्वाखाली त्यानं संघाला विजेतेपदही जिंकून दिले होते.

शादाब जकातीनं 39व्या वर्षी निवृत्ती जाहीर करत, बीसीसीआयचेही आभार मानले. शादाबनं ट्विटरवरून आपली निवृत्ती जाहीर केली. गतवर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये शादाबनं शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

वाचा-अरे देवा! हवेत उडी मारत फक्त 3 बोटांत पकडला कॅच, हा VIDEO पाहून व्हाल हैराण

वाचा-भारताला मोठा झटका, टोकियो ऑलिम्पिकआधी स्टार बॉक्सरवर एका वर्षाची बंदी

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 275 विकेट्स आणि 2700पेक्षा जास्त धावा करूनही शादाबला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. दरम्यान आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळताना त्याच्या नावाची चर्चा झाली. आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाकडून खेळला आहे. शादाब जकातीने आयपीएलमध्ये 59 सामने खेळले आहे.

वाचा-एकाच दिवसात दोन फलंदाजांच्या जीवावर बेतला चेंडू, पाहा धक्कादायक बाउन्सरचा VIDEO

First published:
top videos