रिक्षाचालकाचा मुलगा सुस्साट! फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDEO

रिक्षाचालकाचा मुलगा सुस्साट! फलंदाजांना कळण्याआधीच दांड्या केल्या गुल, पाहा VIDEO

भारत ए विरुद्ध न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारत ए ने न्यूझीलंड इलेव्हनवर 5 गडी राखून विजय मिळवला.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : भारत ए विरुद्ध न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारत ए ने न्यूझीलंड इलेव्हनवर 5 गडी राखून विजय मिळवला. इंडिया ए ने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तीन गडी बाद केले. हैदराबादचा असलेल्या मोहम्मद सिराजचे वडील रिक्षाचालक होते. जेव्हा टीम इंडियात त्याची निव़ड झाली तेव्हापासून वडिलांना रिक्षा चालवू नका असं सिराजने सांगितलं होतं.

न्यूझीलंड इलेव्हनचे एजाज अहमद आणि जॅकब डफी यांना मोहम्मद सिराजने ज्या पद्धतीने बाद केलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिराजने टाकलेल्या चेंडूने थेट मधली स्टम्प अशी काही उडवली की ती उंच हवेत उडाली. यानंतर जॅकब डफीलासुद्धा टाकलेला चेंडूने ऑफ स्टम्प हवेत उडवली.

तत्पूर्वी, इंडिया ए ने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड इलेव्हनला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड इलेव्हनच्या संघाला 230 धावांत रोखलं. भारताकडून सिराजने सर्वाधिक तीन तर खलील अहमद, अक्षर पटेल यांनी दोन आणि विजय शंकर, राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मोहम्मद सिराजने 6.3 षटकांत 33 धावांत तीन गडी बाद केले. भारताला पहिलं यश त्यानेच मिळवून दिलं. जॉर्ज वर्करला ऋतुराज गायकवाडकडे झेल देण्यास भाग पाडलं होतं. न्यूझीलंड इलेव्हनने दिलेलं 230 धावांचे आव्हान इंडिया एने 39.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. पृथ्वी शॉने 35 चेंडूत 48, तर संजू सॅमसनने 21 चेंडूत 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 35 धावांची वेगवान खेळी केली.

न्यूझीलंडमध्ये पोहोचताच विराट जिममध्ये तर शास्त्री गुरुजी फिरायला, PHOTO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 23, 2020 08:16 AM IST

ताज्या बातम्या