श्रीनिवासनंतर आणखी एक इंडियन बोल्ट, 100 मीटर अंतर फक्त 9.51 सेकंदात केलं पार?

श्रीनिवासनंतर आणखी एक इंडियन बोल्ट, 100 मीटर अंतर फक्त 9.51 सेकंदात केलं पार?

कंबाला स्पर्धेत 100 मीटर अंतर 9.55 सेकंदात कापणाऱ्या श्रीनिवास गौडाची चर्चा सुरू असतानाच निशांत नावाच्या तरुणाने त्यापेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण केली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 18 फेब्रुवारी : कर्नाटकातील म्हशींना पळवण्याच्या पारंपरिक स्पर्धेत श्रीनिवास गौंडाने 142.50 मीटरचे अंतर 13.62 सेकंदात पूर्ण केलं होतं. त्याची तुलना थेट उसेन बोल्टशी करण्यात येत होती. आता त्यानंतर एक आठवड्याच्या आतच आणखी एका तरुणाने त्यापेक्षा कमी वेळेत 143 मीटर अंतर कापलं आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिलं आहे. निशांत शेट्टीने 143 मीटरचे अंतर 13.68 सेकंदात पूर्ण केले. म्हणजेच त्याला 100 मीटर अंतर पूर्ण करण्यास 9.51 सेंकदाचा वेळ लागला. हा वेळ श्रीनिवासपेक्षा 0.04 सेकंदानी कमी आहे. त्यामुळे आता निशांतची चर्चा सुरू झाली आहे.

धावण्याच्या शर्यतीत सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून जमैकाच्या उसेन बोल्टचं नाव घेतलं जातं. 100 मीटर शर्यत 1.58 सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आजही अबाधित आहे. दरम्यान, कर्नाटकात कंबाला या पारंपरिक स्पर्धेत श्रीनिवासने 9.55 सेकंदाची वेळ नोंदवली. याबाबत अधिकृत वेळ आणि अंतराची खात्री अद्याप करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता निशांत शेट्टी याने त्यापेक्षा कमी वेळ नोंदवली आहे. बाजागोली जोगीबेट्टू इथल्या निशांत शेट्टीने रविवारी वेन्नूर इथं ही कामगिरी केली.

दरम्यान, श्रीनिवास गौंडाला मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी गौरवल. तसेच त्याला राज्य सरकारकडून 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचं आश्वासनही दिलं. याशिवाय क्रिडामंत्री किरन रिजिजू यांनी श्रीनिवास गौडाला भारतीय  क्रिडा अकादमीत ट्रायल देण्यास सांगितलं. मात्र, त्याने कंबाला इथं होणाऱ्या शर्यतीची तयारी करत असल्याचे सांगत ट्रायलला नकार दिला.

कर्नाटकात म्हशी चिखलगुट्ट्यातून पळवण्याच्या या स्पर्धेला कंबाला असं म्हटलं जातं. मंगळुरु आणि उडुपी भागात या स्पर्धा भरवल्या जातात. अनेक गावांमध्ये या स्पर्धा पार पडतात. कंबाला शर्यत आणि धावण्याची शर्यत यात फरक असतो असंही श्रीनिवास गौंडाने म्हटलं होतं. कंबाला रेसमध्ये चिखलाच्या पाण्यातून धावायचं असतं तर शर्यतीत ट्रॅकवर. मात्र, इथं म्हशी पुढे पळत असतात तर ट्रॅकवर असं काही नसतं.

श्रीनिवासने 9.55 सेकंदात अंतर पार केल्याच्या वृत्तानंतर काही अॅथलीटनी हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. प्रत्यक्षात अंतर आणि लागलेला वेळ याची कोणतीच नोंद नाही. त्यामुळे 9.55 सेकंद ही वेळ काढता येणार नाही. तसंच 100 मीटर पेक्षा जास्त अंतर पार केल्यानंतर त्याच्यानुसार 100 मीटर अंतरासाठी लागलेला वेळ काढणं योग्य नाही. तसेच म्हशींच्या ओढण्यामुळे त्याला मदत होते असंही म्हटलं जात आहे.

वाचा : 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

First published: February 18, 2020, 4:41 PM IST
Tags: usain bolt

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading