भारताल लवकरच मिळणार ज्यूनिअर 'द वॉल’, द्रविडच्या लेकानं 2 महिन्यात ठोकले दुसरे दुहेरी शतक

भारताल लवकरच मिळणार ज्यूनिअर 'द वॉल’, द्रविडच्या लेकानं 2 महिन्यात ठोकले दुसरे दुहेरी शतक

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तसाच काहीसा प्रकार राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडबाबत घडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले मात्र मोजके फलंदाज आजही सर्वांच्या लक्षात आहेत. यात सर्वात भरोवशाचा फलंदाज म्हणून केवळ एकाच खेळाडूचे नाव डोळ्यासमोर येते. तो फलंदाज म्हणजे द वॉल राहुल द्रविड. द्रविडनं एकहाती अनेक सामने गाजवले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी सांभाळत आहे. आता द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोय त्याला लेक समिक द्रविड. द्रविडच्या 14 वर्षीय समितने दोन महिन्यात दोन दुहेरी शतक करत कमाल केली आहे.

204 धावांची तुफान खेळी

राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा समित द्रविडने (Samit Dravid) ज्युनिअर क्रिकेटमध्ये आपले रंग दाखवण्यात याआधीच सुरुवात केली आहे. आता त्यानं अंडर 14 ग्रुप I, डिव्हिजन IIच्या बीटीआर शील्ड स्पर्धेत आपले दुसरे दुहेरी शतक पूर्ण केले. समितने माल्या आदिति आंतरराष्ट्रीय शाळेच्या वतीनं खेळताना 33 चौकारांच्या मदतीने 204 धावा केल्या. समितच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने 3 विकेट गमावत 377 पर्यंत मजल मारली.

वाचा-पत्नीला 192 कोटींची पोडगी देण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू करणार नोकरी!

वाचा-VIDEO : सचिनच्या आयुष्यातला 'तो' क्षण ठरला खास, 9 वर्षानंतर मिळालं अवॉर्ड

गोलंदाजीमध्येही केली शानदार कामगिरी

फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीमध्येही समितने जबरदस्त कामगिरी केली. दुहेरी शतकानंतर समितनं 2 विकेटही घेतल्या. समितच्या या ऑलराऊंडर खेळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघ केवळ 110 धावांतर गारद झाला. याचसोबत समितच्या खेळीमुळं त्याच्या संघाने हा सामना 267 धावांनी जिंकला. याआधी डिसेंबत 2019मध्ये समितने 256 चेंडूत 201 धावा केल्या होत्या.

वाचा-50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

युवा पिढी घडवतोय द्रविड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून राहुल द्रविड व्यस्त आहे. सन 2015 मध्ये प्रथम त्याला भारत अ आणि अंडर 19 संघाचा मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप 2016मध्ये संघाला अंतिम फेरीपर्यंत प्रवेश मिळवला. द्रविडच्या या कामगिरीनंतर प्रशिक्षक म्हणून त्याचा दोन वर्षांचा कार्यकाळ वाढविण्यात आला. यानंतर, सन 2019 मध्ये द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली.

First published: February 18, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या