क्रिकेट प्रेमींना आयसीसी देणार मोठं गिफ्ट, आता वर्ल्ड कपसारख्या 4 स्पर्धा

क्रिकेट प्रेमींना आयसीसी देणार मोठं गिफ्ट, आता वर्ल्ड कपसारख्या 4 स्पर्धा

आयसीसीकडून क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन केलं जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : क्रिकेटच्या खेळात बदलत्या काळानुसार अनेक नवे बदल होत आहेत. सध्या झटपट क्रिकेटच्या जमान्यात अनेक नियमांमुळे क्रिकेट रोमांचक होत आहे. कसोटी, वनडेमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. चाहत्यांना आणखी एक भेट देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. लवकरच आयसीसीकडून 2024 पासून चॅम्पियन्स कपची सुरु करण्याची घोषणा केली जाऊ शकते.

सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा आहे. त्याशिवाय चॅम्पियन्स कप सुरु झाल्यास आणखी एक मोठी स्पर्धा होईल. चॅम्पियन कप टी20 आणि एकदिवसीय प्रकारात खेळला जाईल. यात टी20 साठी आयसीसी रँकिंगमधील टॉप टेन तर एकदिवसीय स्पर्धेसाठी टॉप 6 संघांचा सामना होईल.

आयसीसीने गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात चॅम्पियन्स कपचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार 2024 आणि 2028 मध्ये टी20 चॅम्पियन्स कप खेळवला जाईल. तर 2025, 2029 मध्ये एकदिवसीय चॅम्पियन्स वर्ल्ड कप खेळवला जाईल. याशिवाय 2026 आणि 2030 मध्ये टी20 वर्ल्ड कप आणि 2027 आणि 2031 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहेत. यामुळे क्रिकेटप्रेमींनना दरवर्षी आयसीसीची मोठी स्पर्धा बघायला मिळणार आहे.

वाचा : 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

फक्त पुरुष क्रिकेट संघाचा नाही तर महिला क्रिकेट संघासाठीसुद्धा चॅम्पियन्स कप स्पर्धा आयोजित केली जाईल. 2023 आणि 2027 मध्ये महिला एकदिवसीय चॅम्पियन्स कप आणि 2024 आणि 2026 मध्ये महिला टी20 चॅम्पियन्स कपचे आयोजन केले जाईल. याशिवाय महिलांचा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2025 आणि 2029 मध्ये आणि टी20 वर्ल्ड कप 2026 आणि 2030 मध्ये होणार आहे.

वाचा : पत्नीला 192 कोटींची पोटगी देण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू करणार नोकरी!

First published: February 18, 2020, 6:12 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या