नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोनामुळं जगभरात सध्या हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे जगभरातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. एवढेच नाही तर क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामुळे सर्व क्रिकेट सामनेही रद्द झाले आहेत. भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मात्र कोरोनाते संक्रमण वाढत राहिल्यास जवळजवळ एक वर्ष एकही क्रिकेट सामना होणार नाही, असा धक्कादायक खुलासा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे.
कोरोनामुळे जगातील बर्याच देशांमधील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आले आहेत किंवा रद्द केले गेले आहेत. अगदी टोकियो ऑलिम्पिकदेखील एका वर्षासाठी तहकूब करण्यात आली आहे. याच कारणामुळे शोएब अख्तरने ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे कमी असल्याचे सांगितले आहे.
वाचा-VIDEO : टीम इंडियाने सुरू केली Isolation क्रिकेट लीग, असा सामना कधीच पाहिला नसेल
वाचा-कोरोनामध्येही 'हा' देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव
...तर एकवर्ष क्रिकेट सामने होणार नाहीत
रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, "खरं सांगायचं तर मला माहित नाही की कोरोनाव्हायरस किती काळ असेल. किती लोक या संसर्गाचे बळी ठरतात हे समजत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही". पाकिस्तानमध्येही दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे.
वाचा-क्रिकेट चाहत्यांना सगळ्यात मोठा धक्का, कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप होणार रद्द?
एक वर्ष राहणार कोरोनाचे संकट
शोएब अख्तर म्हणाला की, "कमीतकमी एक वर्ष जगात कुठेही क्रिकेट सामने होणार नाहीत. मला वाटतं की कोरोनाव्हायरस एक वर्ष तरी राहिल. मी फक्त अशी आशा व्यक्त करतो की आपण कोरोनावर विजय मिळवू". कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
वाचा-लॉकडाऊनचा IPLलाही फटका, अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली स्पर्धा
'कोरोनासाठी भारत-पाक सामने व्हावे'
पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अलीकडेच कोरोना पीडितांसाठी भारत-पाकिस्तान यांच्यात चॅरिटी मालिकेची कल्पना सांगितली होती. देऊन चर्चेला आला होता. भारतीय संघाचा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार कपिल देवने हे नाकारले तरी भारताला पैशांची गरज नाही असे म्हटले तर अनुभवी फलंदाज सुनील गावस्कर म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत भारत-पाकिस्तान मालिका शक्य नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.