जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सचिनच्या सल्ल्यानंतर यशस्वीची आणखी एक शतकी खेळी, पण अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

सचिनच्या सल्ल्यानंतर यशस्वीची आणखी एक शतकी खेळी, पण अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

सचिनच्या सल्ल्यानंतर यशस्वीची आणखी एक शतकी खेळी, पण अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

वर्ल्ड कपनंतरही यशस्वी जयस्वाल चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. मुंबईसाठी त्यानं 243 चेंडूंत 185 धावांची शानदार खेळी खेळली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी, या स्पर्धेत यशस्वी जयस्वालनं शानदार कामगिरी केली. वर्ल्ड कपमध्ये यशस्वीला सलामीवीराचा पुरस्कारही देण्यात आला. अजूनही यशस्वीचा फॉर्म शानदार फॉर्म कायम आहे. यशस्वीनं नुकत्याच झालेल्या अंड- 23 कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये शतकी खेळी केली. वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर प्रथमच मैदानात उतरलेल्या यशस्वीने मुंबईच्या उपांत्यपूर्व सामन्यात फलंदाजी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पुडुचेरीविरुद्ध त्याने 185 धावांची खेळी केली. यशस्वीच्या या मोठ्या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 449 धावा केल्या आहेत. वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी! 6 महिन्यांनंतर स्टार क्रिकेटपटू करणार कमबॅक मात्र, महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अजुर्न पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. या सामन्यात अर्जुनने केवळ 6 धावा केल्या, यासाठी त्यानं 45 खेळाडूंचा सामना केला. गोलंदाजीमध्ये अर्जुनने चांगली कामगिरी केली. त्याने 8 षटकात 27 धावा देत 2 विकेट घेतल्या. वाचा- ‘आम्ही मॅच जिंकलो असतो पण….’, या खेळाडूंवर विराटनं फोडले पराभवाचे खापर! यशस्वीची शतकी खेळी वर्ल्ड कपनंतरही यशस्वी जयस्वाल चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. मुंबईसाठी त्यानं 243 चेंडूंत 185 धावांची शानदार खेळी खेळली. ज्यामध्ये 19 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. यशस्वी व्यतिरिक्त अमन खानने मुंबईकडून 64 तर कर्णधार हार्दिक तमोरने 86 धावा केल्या. वाचा- ‘मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना नाही’, क्रिकेटपटूचे धक्कादायक वक्तव्य वर्ल्ड कपमधला यशस्वीचा शानदार फॉर्म वर्ल्ड कपमध्ये यशस्वीने 6 सामन्यात सर्वाधिक 400 धावा केल्या. या स्पर्धेत त्याने सहा डावांमध्ये 50 हून अधिक धावा केल्या होत्या. यात 88, 105*, 62, 57*, 29*, 59 खेळांचा समावेश होता. आता सीके नायडू ट्रॉफीनंतर आयपीएलच्या तयारीवर त्याचा भर आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 2.4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात