मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Elon Musk: रोनाल्डोच्या मॅन्चेस्टर युनायटेडवर एलन मस्कची नजर? पाहा मस्कच्या ‘त्या’ ट्विटची का होतेय चर्चा?

Elon Musk: रोनाल्डोच्या मॅन्चेस्टर युनायटेडवर एलन मस्कची नजर? पाहा मस्कच्या ‘त्या’ ट्विटची का होतेय चर्चा?

एलन मस्क

एलन मस्क

Elon Musk: संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि कधी कधी वादाला कारणीभूत ठरणाऱ्या ट्विट्ससाठी मस्क ओळखले जातात. याआधीही मस्क यांचे काही ट्विट्स चर्चेचा विषय ठरले होते. आताही त्यांनी एका ओळीचं ट्विट केलं पण त्यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 ऑगस्ट: युरोपीयन फुटबॉलमधला सर्वात लोकप्रिय क्लब म्हणजेच मॅन्चेस्टर युनायटेड. जगातला सध्याच्या घडीचा दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोही याच क्लबचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मॅन्चेस्टर युनायटेडचा अख्ख्या युरोपमध्ये दबदबा आहे. पण हाच क्लब विकत घेण्याची घेण्याची योजना आखतायत जगातल्या धनाढ्य व्यक्तींपैकी एक टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क. मस्क हा इंग्लिश क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडियातून त्यांनी ही माहिती दिली आहे. मस्क यांचं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

खरं तर एलन मस्क यांनी ट्विटरवरुन काही राजकीय ट्विट केले आहेत. त्याच ट्विटखाली त्यांनी याचीही घोषणा केली की ते मॅन्चेस्टर युनायटेड हा फुटबॉल क्लब विकत घेणार आहेत. मस्क यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिलेली नाही. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मी हे स्पष्ट करतोय की रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टीला मी पाठिंबा देतोय.” पण याच ट्विटनंतर त्यांनी “याशिवाय मी मॅन्चेस्ट युनायटेड क्लब विकत घेतोय’’ असं दुसरं ट्विट केलं. त्यामुळ ट्विटरवर त्यांच्या या ट्विटनंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

मॅन्चेस्टर युनायटेडकडून नो कमेंट्स

अशा प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि कधी कधी वादाला कारणीभूत ठरणाऱ्या ट्विट्ससाठी मस्क ओळखले जातात. याआधीही मस्क यांचे काही ट्विट्स चर्चेचा विषय ठरले होते. आताही त्यांनी एका ओळीचं ट्विट केलं पण त्यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

दरम्यान मॅन्चेस्टर युनायटेड क्लबची मालकी अमेरिकेच्या ग्लेझर कुटुंबाकडे आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर ग्लेझर फॅमिलीनंही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - FIFA ची भारतावर बंदी, प्रफुल पटेलांचा हट्ट पडला महागात! समजून घ्या क्रोनोलॉजी

मॅन्चेस्टर युनायटेड

  • मॅन्चेस्टर युनायटेड हा 144 वर्ष जुना क्लब आहे
  • अमेरिकन व्यावसायिक माल्कम ग्लेझर यांच्या कुटुंबाकडे या क्लबची मालकी आहे
  • रेड डेव्हिल्स या नावानंही हा क्लब ओळखला जातो
  • फुटबॉलविश्वातील प्रतिष्ठेच्या युरोपीयन कपचं तीन वेळा विजेतेपद
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो, ख्रिस्टियन एरिक्सन, मार्कस रॅशफर्ड अशा नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश

First published:

Tags: Football, Sport