मुंबई, १५ जानेवारी : पुण्यात रंगलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा पुण्याच्या शिवराज राक्षेने पटकावली. अंतिम सामन्यात शिवराज ने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटात चीतपट केलं. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत अतिशय रोमांचक झाली असून या कुस्तीतील शिवराजच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या शिवराजला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांनी ट्विट करत लिहिले, "पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!".
पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/v46nuwpRmI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 14, 2023
शिवराज राक्षे हा मूळचा राजगुरुनगरच्या राक्षेवाडीचा आहे. शिवराज हा शेतकरी कुटुंबातून असून ट्यान्कव्ह दुधाचा व्यवसाय आहे. शिवराजला कुस्तीचे बाळकडू त्याच्या कुटुंबातूनच मिळाले. त्याचे वडील, भाऊ हे सर्व पैलवान आहेत. शिवराजने महाराष्ट्र केसरी व्हावं असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते.
हे ही वाचा : खाशाबांनंतर महाराष्ट्रात एकही ऑलिम्पिक मेडलिस्ट नाही; ब्रिजभूषण यांनी व्यक्त केली खंत
पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा झाली असून यात राज्यातील तब्बल ९०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 'महाराष्ट्र केसरी' च्या किताबासाठी झालेल्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारली. महाराष्ट्र केसरी' च्या किताबा सह त्याने, मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे. तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Sharad Pawar, Sports, Wrestler