पुणे, 14 जानेवारी : पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीच्या लढतीनिमित्त आलेल्या राष्ट्रीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांनी महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू करून पैलवानांना मदत करावी अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली. तसंच देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रात कुस्तीतलं ऑलिम्पिक मेडल जिंकणारा खेळाडू नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ऑलिम्पिकचं पहिलं मेडल महाराष्ट्रातून आलं पण विचार करण्याचा मुद्दा असा आहे की खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ पडला होता. तो दुष्काळ सुशिल कुमारने संपवला. 2008 पासून आजपर्यंत आपण ऑलिम्पिकमध्ये सलग मेडल्स जिंकतोय. पण गेल्या ६१ वर्षांपासून महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक मेडल घेऊन आला नाही हा आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचं खासदार ब्रीजभूषण यांनी म्हटलं. हेही वाचा : महाराष्ट्रातील कुस्तीपट्टूंच्या मानधनात मोठी वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की महाराष्ट्राचं सरकारने मिशन ऑलिम्पिकच्या नावाने राज्यातील खेळाडूंना मदत करावी. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपावा. इथल्या मुली, मुलं चांगली आहेत पण इथं टार्गेट कमी होतंय असं ब्रीजभूषण यांनी म्हटलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मिशन ऑलिम्पिक सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. याशिवाय राज्य, देश पातळीवर कुस्तीत प्रतिनिधीत्व करणाऱ्या पैलवानांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणाही फडणवीसांनी यावेळी केली. महाराष्ट्र केसरीची सुरुवात झाली तेव्हा मुली कुस्ती खेळत नव्हत्या. पण आता मुलीही कुस्ती खेळतात आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन आहे की मुलींना कमी समजू नये. गेल्या ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने मेडल जिंकलं होतं असं म्हणत महिलासुद्धा कुस्तीत आता मागे नाहीत असं ब्रीजभूषण यांनी सांगितले. हेही वाचा : Maharashtra Kesari Live : महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू करणार : देवेंद्र फडणवीस ब्रीजभूषण सिंह यांनी म्हटलं की," महाराष्ट्र और उत्तर प्रदेशचा संबंध आजचा नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या किल्ल्यात औरंगजेबाने दगाबाजी करून बंद केलं होतं तेव्हा उत्तर प्रदेशच्या लोकांनी महाराजांना महाराष्ट्रात सुरक्षित पोहोचवण्यासाठी मदत केली होती. शिवाजी महाराजांचा आदर आम्ही यासाठी करतो की त्यांनी धर्म नाही पाहिला तर ते सर्वांना सोबत घेऊन जायचे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.