Home /News /sport /

शाहीन आफ्रिदीने 'ड्रीम हॅट्रिक'साठी घेतली या तीन खेळाडूंची नावं, लिस्टमध्ये हे भारतीय

शाहीन आफ्रिदीने 'ड्रीम हॅट्रिक'साठी घेतली या तीन खेळाडूंची नावं, लिस्टमध्ये हे भारतीय

पाकिस्तानचा युवा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) 5 दिवसांपूर्वी आयसीसी प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलं होतं. यानंतर आता शाहीन आफ्रिदीने त्याची एक इच्छा बोलून दाखवली आहे.

    मुंबई, 29 जानेवारी: पाकिस्तानचा युवा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) 5 दिवसांपूर्वी आयसीसी प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलं होतं. यानंतर आता शाहीन आफ्रिदीने त्याची एक इच्छा बोलून दाखवली आहे. शाहीन आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली ड्रीम हॅट्रिक (Dream Hattrick) पूर्ण करण्यासाठी तीन भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रॅपिड फायर इंटरव्ह्यूमध्ये आफ्रिदीला त्याच्या ड्रीम हॅट्रिकबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्याने विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या तीन भारतीयांची विकेट घेऊन हॅट्रिक पूर्ण करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. शाहीन आफ्रिदीने मागच्या वर्षी 22.2 च्या सरासरीने 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 78 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला त्याच्या करियरमधली सगळ्यात स्पेशल विकेट कोणती? असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने विराट कोहलीचं नाव घेतलं. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीने विराट कोहलीची विकेट घेतली होती. आफ्रिदीने मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध केलेली कामगिरी स्पेशल असल्याचंही सांगितलं. 'मी याआधीही लक्षात राहिल अशी कामगिरी केली होती, यात टेस्टमध्ये 5 विकेटचाही समावेश आहे, पण माझ्यासाठी भारताविरुद्धची टी-20 वर्ल्ड कपमधली कामगिरी खास आहे. कारण भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये आम्हाला पहिल्यांदाच विजय मिळाला होता. भारत-पाकिस्तान सामना कायमच रोमांचक असतो. माझ्यासाठी 2021 चांगलं राहिलं. 2022 मध्येही अशीच कामगिरी करण्याची इच्छा आहे,' असं आफ्रिदी म्हणाला. आफ्रिदीने 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलची विकेट घेतली होती, पण त्याला हॅट्रिक घेता आली नव्हती. डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या आफ्रिदीने पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माला एलबीडब्ल्यू केलं, यानंतर पुढच्याच ओव्हरला त्याने केएल राहुलला बोल्ड केलं. मग त्याने विराट कोहलीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या मुलाखतीमध्ये आफ्रिदीला करियरच्या शेवटी कोणतं रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची इच्छा आहे, असंही विचारण्यात आलं. तेव्हा त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर एक बॉलर बनण्याची इच्छा असल्याचं उत्तर शाहीन आफ्रिदीने दिलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, India vs Pakistan, Kl rahul, Rohit sharma, Shahid Afridi, Sports, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या