क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या 'या' गोलंदाजाला कोरोना

क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या 'या' गोलंदाजाला कोरोना

क्रिकेट जगातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

लंडन, 21 मार्च : कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यातून क्रीडा जगदेखील सुटू शकलेले नाही. बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातील बहुतेक फुटबॉलपटू होते. मात्र आता क्रिकेटविश्वातही कोरोना घुसला आहे. स्कॉटलॅंडच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. क्रिकेट जगातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळं सध्या भीतीचे वातावरण आहे.

याआधी अनेक क्रिकेटपटूंची चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सध्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधील खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. यातच पाकिस्तानी वंशाचा फिरकीपटू माजिद हकला कोरोना झाल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. स्कॉटलंडचा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू माजीद हक हा कोरोना विषाणूंमुळे पॉझिटिव्ह आढळला आहे.

वाचा-VIDEO : एलियन नाही हा तर क्रिकेटपटू! कोरोनाबाबत जनजागृतीसाठी वापरला अनोखा फंडा

वाचा-लय भारी! कोरोनाला हरवण्यासाठी आता दिग्गज क्रिकेटपटू बनवतोय सॅनिटायझर

माजिद हकने 2006 ते 2015 पर्यंत स्कॉटलंडकडून 54 एकदिवसीय सामने आणि 21 टी -२० सामने खेळले आहेत. माजिदने सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. ग्लासगोच्या रॉयल अलेक्झांड्रा हॉस्पिटलमध्ये या 37 वर्षीय खेळाडूवर उपचार सुरू आहेत.माजीदने, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मी आज कदाचित घरी परत येऊ शकते. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. मी लवकरच परत येईन, असे लिहिले आहे. दरम्यान स्कॉटलंडमध्ये गुरुवारी 266 प्रकरणे समोर आली आहेत.

वाचा-'द वॉल'ने शिकवलं कोरोनाशी लढायचं कसं? सोशल मीडियावर पोस्ट VIRAL

2006मध्ये केले होते पदार्पण

माजीदने 2007मध्ये भारताविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर 2015च्या वर्ल्ड कपमध्येही माजीद खेळला होता. बांगलादेश विरुद्ध 2006 मध्ये झालेल्या वन डे सामन्यात माजीद हकने स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2015 मध्ये निवृत्ती घेतली. माजीदने 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 54 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने 566 धावा तर 60 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading