लय भारी! कोरोनाला हरवण्यासाठी आता दिग्गज क्रिकेटपटू बनवतोय सॅनिटायझर

लय भारी! कोरोनाला हरवण्यासाठी आता दिग्गज क्रिकेटपटू बनवतोय सॅनिटायझर

आतापर्यंत जगभरात कोरोनामधून 2 लाख 20 हजार 000 संक्रमणाची नोंद झाली असून 9 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

  • Share this:

मेलबर्न, 20 मार्च : कोरोनाव्हायरस (CoronaVirus) या महामारीचा फटका साऱ्या जगाला बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे 41 हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामधून 2 लाख 20 हजार 000 संक्रमणाची नोंद झाली असून 9 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. या सगळ्यात कोरोनाला हरवण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू पुढे आला आहे.

महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) कंपनीने सॅनिटायझर्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियात रुग्णांची संख्या वाढत आहे, तर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर्सची कमतरता भासत आहे. यासाठी शेन वॉर्नने हा निर्णय घेतला आहे.

वॉर्नच्या कंपनी ‘708 जिन’ने 17 मार्चपासून 70 टक्के मेडिकल ग्रेड असलेले सेनिटायझर्स बनवण्यास सुरुवात केली आहे. हे सॅनिटायझर ऑस्ट्रेलियामधील दोन मोठ्या रुग्णालयांना देण्यात येतील.

 

View this post on Instagram

 

So proud of the team ! Bloody awesome guys - well done to all @708gin ❤️

A post shared by Shane Warne (@shanewarne23) on

वॉर्न यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या लोकांसाठी ही एक अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि हा आजार टाळण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.

ऑस्ट्रेलियात सॅनिटायझर्सची मागणी वाढली

ऑस्ट्रेलियामध्ये 5 हजार 565 प्रकरणे समोर आली आहेत. तर सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या घटनांमुळे ऑस्ट्रेलियातील काही भागांमध्ये हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे आणि ती विकत घेताना अनागोंदी आहे. चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू पसरण्यास सुरवात झाली आणि त्याने संपूर्ण जगाला वेढले आहे. भारतातही त्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. हे पाहता परदेशी भारतात येण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर परत आलेल्या भारतीयांची कसून चौकशी केली जात आहे. देशातील मॉल, शाळा, महाविद्यालये, जिम, थिएटर ही काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत.

First published: March 20, 2020, 12:09 PM IST

ताज्या बातम्या