VIDEO : एलियन नाही हा तर क्रिकेटपटू! कोरोनाबाबत जनजागृतीसाठी वापरला अनोखा फंडा

VIDEO : एलियन नाही हा तर क्रिकेटपटू! कोरोनाबाबत जनजागृतीसाठी वापरला अनोखा फंडा

कोरोनामुळे जगभर भीतीचं वातावरण असून सर्वांनाच घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : सध्या जगभर कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. क्रीडा क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला असून जवळपास सर्वच स्पर्धांचे आय़ोजन पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आलं आहे. क्रिकेटचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे सर्व सामने रद्द केले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास दहा हजार लोकांना जीव गमावावा लागला आहे. तर अडीच लाख लोकांना कोरोना झाला आहे. भारतात आयपीएलच्या स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. चीन, इटली आणि इराणला कोरोनाचा जबरदस्त विळखा असून इथं झपाट्यानं व्हायरस पसरत आहे. अनेक दिग्गज व्यक्ती, क्रिकेटपटू कोरोनामुळे घरातच बंदिस्त झाले आहेत. दरम्यान या व्यक्ती, खेळाडूंकडून कोरोनाबाबत जनजागृतीही केली जात आहे. सध्याच्या कठिण काळात लोकांनी संयम बाळगण्याची गरज आहे.

विंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांन व्हिडिओ तयार केला आहे. यात मास्क आणि गॉगल घातलेला डॅरेन सॅमी एलियनसारखाच दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी चालत असतानाच त्यानं हा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना सॅमीने “Me vs #covid_19” असा कॅप्शन दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Me vs #covid_19

A post shared by daren (@darensammy88) on Mar 19, 2020 at 1:48am PDT

कोरोनाव्हायरसने इटलीमध्ये मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या चीनपेक्षा इटलीमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. एकाच दिवशी इटलीमध्ये 427 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यामुळे इटलीमधील मृतांचा आकडा 3405 झाला आहे. तर, 3245 लोकांची परिस्थिती चिंताजनक आहे.  12 मार्च पासून इटलीमध्ये लॉकडाउन सुरू आहे, आता हाच लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आला आहे. इटलीमधील जवळपास सर्व लोकांना त्यांच्या घरी रहाण्यास सांगितले गेले आहे.

हे वाचा : ‘कोरोनाव्हायरस पॉर्न ते गो कोरोना’,COVID19 इतक्याच वेगाने VIRAL झाल्या या गोष्टी

First published: March 20, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या