मुंबई, 19 मार्च : सध्या जगभर कोरोनाची दहशत पसरली आहे. संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी हे सांगणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच कोरोनापासून वाचण्यासाठी राहुल द्रविडचं उदाहरण देत काही टिप्स देण्यात येत आहे. सोशल मीडियावर अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडच्या फलंदाजीच्या शैलीवरून काय घ्यावं हे सांगणारी पोस्ट व्हायरल होत आहे. यात एखादा धोकादायक फटका मारण्यापेक्षा तो सोडणं कधीही चांगलं असं सांगत सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता सुरक्षित अंतर ठेवण्यास आणि गर्दीत न जाण्याचं आवाहन केलं आहे.
How to fight Coronavirus: Lessons from Rahul Dravid. (A thread) pic.twitter.com/UYfWUTs4FO
— Sagar (@sagarcasm) March 16, 2020
कोरोनामुळे हात वारंवार धुण्यास आणि स्वच्छ ठेवा असा सल्ला दिला जात आहे. त्यासाठी द्रविडचा क्षेत्ररक्षण करत असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित हात असणे गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही संयम बाळगण्याचा धडा देण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. इडन गार्डनवर द्रविडने लक्ष्मणसोबत केलेल्या 376 धावांच्या भागिदारीवेळेचा फोटो आहे. त्यावेळी भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला होता.
Don’t Panic. You can overcome the worst of the situations with patience pic.twitter.com/H3WZqZhIO6
— Sagar (@sagarcasm) March 16, 2020
गरज पडेल तेव्हा कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा असं सांगणारा एक फोटो यामध्ये आहे. एकदिवसीय सामन्यात द्रविडवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तीसुद्धा त्यानं समर्थपणे पेलली. याशिवाय संघात वेगवेगळ्या भूमिका बजावताना कठोर निर्णय घेण्याची तयारीही असावी असाही संदेश या व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आला आहे. पाहा VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं राहुल द्रविडने अंडर 19 क्रिकेट संघाला घडवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम केल्यानंतर राहुल द्रविडने प्रशिक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी करत भारताचे य़ुवा क्रिकेटपटू घडवले आणि फक्त घडवलेच नाहीत तर त्यांना विजेताही केलं. हे वाचा : मुंबईच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! स्कोरर, पंच ते आता थेट ICC पॅनेलवर निवड