जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअपनंतर शुभमन गिलच्या लाईफमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; डिनर डेटचा फोटो VIRAL

सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअपनंतर शुभमन गिलच्या लाईफमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; डिनर डेटचा फोटो VIRAL

सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअपनंतर शुभमन गिलच्या लाईफमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; डिनर डेटचा फोटो VIRAL

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फारच जुनं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटरसोबत संसार थाटला आहे. तर काही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट-  बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फारच जुनं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटरसोबत संसार थाटला आहे. तर काही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. यामध्ये अनुष्का शर्मा विराट कोहली, गीता बसरा-हरभजन सिंह, युवराज सिंह- हेजल कीच अशा अनेक जोड्यांचा समावेश होतो. स्वतः सारा अली खानची आजी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोरने क्रिकेटर मन्सूर अली खानसोबत लग्न केलं होतं. तसेच अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल हेसुद्धा रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची लाडकी लेक सारा अली खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या चित्रपटांसोबतच सारा आपल्या लव्हलाईफमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते. या चार वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये साराचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं आहे. आजही सारा आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत आली आहे. आता सारा चक्क क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. क्रिकेटर शुभमन गिल आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन गिल लिजंडरी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचं समोर आलं होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या.

जाहिरात

(हे वाचा: Raveena Tandon: रविना टंडन खरेदी करणार नवी थार; आनंद महिंद्रांच्या ट्विटने वेधलं लक्ष ) सारा तेंडुलकरसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खानला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकतंच एका इन्स्टाग्राम अकाउंटवर या दोघांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सारा अली खान आणि शुभमन गिल दिसून येत आहेत. हे दोघे दुबईत सोबत डिनर डेटसाठी गेल्याच सांगितलं जात आहे. सारा तेंडुलकरनंतर आता शुभमन गिलच्या आयुष्यात सारा अली खानची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जात आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात