मुंबई, 30 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने 90 च्या दशकात अफाट लोकप्रियता मिळवली होती. अप्रतिम अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर तिने मनोरंजन सृष्टीत आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. आजही अभिनेत्रीचा जादू कायम आहे. अभिनेत्री आपल्या व्यावसायिकच नव्हे तर खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. पाहूया काय आहे हे नेमकं ट्विट. आपल्या चित्रपटांसोबतच अभिनेत्री रविना टंडन आपल्या रॉयल लाईफस्टाईलमुळेसुद्धा ओळखली जाते. कोट्यावधींचं घर ते महागड्या कार ती अतिशय आलिशान आयुष्य जगते. अभिनेत्रीला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. तिच्याजवळ अतिशय सुंदर कार कलेक्शनदेखील आहे. परंतु आता अभिनेत्रीने आपल्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कराचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. ही कार दुसरी कोणती नसून ‘महिंद्रा थार’ असल्याचं समोर येत आहे. याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक ट्विटदेखील केलं आहे. हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ- प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ‘क्लब महिंद्रा’ची जाहिरात करतांना दिसून येत आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय, 80टक्केपेक्षा ज्यादा सोयीसुविधा या रिसॉर्टमध्ये उपलब्ध आहेत. यावर आनंद महिंद्रांनी ट्विट करत लिहलंय, ‘यातील 10 टक्के रिसॉर्ट्समध्ये मी नाहीय. पण रविना टंडन तुम्ही मला त्यासाठी तयार केलं. मी आता माझी बॅग भरायला सुरुवात करणार आहे’.
Sir, me too gearing up and buying the new Thar too! 😍#tharmahindra . Learnt my driving ( and my first vehicle in college) on a Mahindra jeep and want to continue.. @anandmahindra 😄👍🏻 https://t.co/Q1CGvO7zlK
— Raveena Tandon (@TandonRaveena) August 29, 2022
**(हे वाचा:** Kartik Aryan: कार्तिक आर्यनचं साऊथ अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल, नाकारली इतक्या कोटींची ऑफर ) रविना टंडन ट्विट- आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत रविनाने लिहलंय, ‘सर मीसुद्धा याचा एक भाग बनणार आहे. मी महिंद्रा थार खरेदी करणार आहे. याच गाडीने मी कार चालवायला शिकले होते. माझ्या कॉलेज काळात माझ्याकडे असलेली हीच पहिली कार होती. आणि आता मी यालाच पुढे कंटिन्यू करणार आहे’. अभिनेत्रींच्या या ट्विटनंतर लवकरच तिच्या घरी आणखी एक महागडी कार येणार असल्याची चर्चा रंगली आहे.