बर्लिन, 18 फेब्रुवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो. सचिनला नुकताच लॉरेयस20 स्पोर्टिंग मूमेंट 2000-2020चा (Laureus20 Sporting Moment 2000-2020) पुरस्कार मिळाला आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे झालेल्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला. वर्ल्ड कप 2011मध्ये भारताने विजेतेपद जिंकल्यानंतर सचिनला सर्व खेळाडूंनी खांद्यावर उचलून घेतले होते, या क्षणाची सर्वोत्तम क्षण म्हणून निवड झाली आहे. सचिन तेंडुलकरला 2011 वर्ल्ड कप विनिंग मुमेंटला या अवॉर्डसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात आले होते. सचिनसोबत अनेक दावेदार 2000 ते 2020 मधील खेळातील सर्वोत्तम क्षण (Laureus Sporting Moment Award) या यादीत सामिल होते. मात्र सचिनच्या त्या क्षणाला सर्वोत्तम क्षण म्हणून अवॉर्ड मिळाला. वाचा- ‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन!
Sachin Tendulkar wins #Laureus20 Sporting Moment 2000-2020 award. (file pic) pic.twitter.com/zeJgy0fAZv
— ANI (@ANI) February 17, 2020
दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवत वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवला. हा वर्ल्ड कप सचिनसाठी खास होता. कारण सहा वर्ल्ड कप खेळल्यानंतर अखेर 2011मध्ये भारतानं हा किताब जिंकला. धोनीनं अंतिम चेंडूत षटकार मारल्यानंतर संघातील सर्व खेळाडू मैदानावर आले, आणि त्यानंतर खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर उचलून धरले. वाचा- वर्ल्ड कपमध्ये अनधिकृत टीम इंडियाचा पाककडून पराभव, इमरान खान अभिनंदन करून फसले
वाचा- मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी सज्ज लॅप ऑफ ऑनर दरम्यान सचिनच्या डोळ्यात होते अश्रू भारतीय संघाने तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेतल्यानंतर खेळाडूंनी लॅप ऑफ ऑनर करत मैदानावर फेऱ्या मारल्या. यावेळी सचिनसह सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा भारताला वर्ल्ड जिंकता आला. महत्त्वाचा म्हणजे सचिनने आपल्या होम ग्राऊंड वानखेडेवर हा किताब जिंकला.

)







