वर्ल्ड कपमध्ये अनधिकृत टीम इंडियाचा पाकने केला पराभव, इमरान खान अभिनंदन करून फसले

वर्ल्ड कपमध्ये अनधिकृत टीम इंडियाचा पाकने केला पराभव, इमरान खान अभिनंदन करून फसले

भारत सरकारला न सांगताच पाकिस्तानमध्ये गेलेल्या टीमचा कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे अभिनंदन पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलं.

  • Share this:

लाहोर, 17 फेब्रुवारी : पाकिस्तानच्या संघाने भारताच्या अनधिकृत संघाला पराबूत करून सर्कल कबड्डी वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला 43-41 ने पराभूत केलं. यानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. विजयाच्या शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. चाहत्यांनी म्हटलं की, या विजयाचा आधार घेऊन इमरान खान त्यांच्या देशातील लोकांनी मूर्ख बनवत आहेत.

सर्कल कबड्डी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ सरकारच्या परवानगीशिवाय पाकमध्ये गेला होता. भारताच्या मंत्रालयालासुद्धा याची माहिती नव्हती की कोणत्या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला गेला आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली होती.

पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्कल कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताशिवाय इंग्लंड, ईराण, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह आणखी काही संघांनी सहभाग घेतला होता. भारताच्या या अनधिकृत संघावर विजय मिळवल्यानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या खेळाडूंचे अभिनंदन केले. भारताला हरवून कबड्डी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल पाक संघाचे अभिनंदन असं ट्विट त्यांनी केलं.

ट्विट केल्यानंतर इमरान खान यांना चाहत्यांनी ट्रोल केलं. एका चाहत्याने म्हटलं की, पाकिस्तानचा संघ प्रो कबड्डी लीगमधील पटना पायरेट संघालाही हरवू शकणार नाही. तसेच एका युजरने सांगितलं की, भारताने कबड्डी वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला नव्हता. भारतीय संघ पाकमध्ये दाखल झाल्याबद्दल क्रीडा मंत्री किंवा राष्ट्रीय महासंघ यांपैकी कोणालाही माहिती नव्हती किंवा संघाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र भारतीय संघ परस्पर या चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी वाघा बॉर्डरकडून लाहोरमध्ये पोहचला.

वाचा : भारताच्या 3 मॅच विनर खेळाडूंना विराटनं दिला डच्चू! आता IPL वाचवणार करिअर

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नव्हती. पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी नसताना खेळाडू कसे पोहचले, याची चौकशीही करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.

वाचा : मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी सज्ज

First published: February 17, 2020, 8:15 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या