मुंबई : अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून कधी खेळणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात अर्जुनने डेब्यू केलं. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. एवढंच नाही तर त्याच्या कामागिरीचं वडील सचिन तेंडुलकर यांनी तोंडभरून कौतुक देखील केलं आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 22व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर वडील सचिन तेंडुलकर यांनी एक भावुक पोस्ट खास मुलासाठी लिहिली आहे.
Arjun, today you have taken another important step in your journey as a cricketer. As your father, someone who loves you and is passionate about the game, I know you will continue to give the game the respect it deserves and the game will love you back. (1/2) pic.twitter.com/a0SVVW7EhT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
You have worked very hard to reach here, and I am sure you will continue to do so. This is the start of a beautiful journey. All the best! 👍💙 (2/2)
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 16, 2023
अर्जुन तेंडुलकर 2021पासून मुंबई इंडियन्स टीममध्ये आहे. मात्र दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची एकही देण्यात आली नाही. मुंबईने अखेर अर्जुनला यंदाच्या मोसमात संधी देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात अर्जुनने गोलंदाजी करत 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
IPL 2023 : अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहाससचिन तेंडुलकर यांनी अर्जुनला खास पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यांनी एक भावुक संदेश दिला. अर्जुन, आज तू क्रिकेटर म्हणून तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याचा प्रवास करत आहेस. तुमच्यावर आणि या खेळावर खूप प्रेम करणारे वडील म्हणून, मला माहीत आहे की तू या खेळाला योग्य तो आदर देशील तुला खूप प्रेम मिळेल.
तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागली आहे. हे आम्ही पाहिलं आहे, तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की तू पुढेही अशीच मेहनत घेशील आणि फळाला येईल. ही एक चांगली सुरुवात आहे असं सचिन तेंडुलकर यांनी पोस्ट लिहून म्हटलं आहे. तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरला आयपीएल मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असलेल्या अर्जुनने मुंबईकडून गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये केकेआरला केवळ 17 धावा दिल्या.