मुंबई, 16 डिसेंबर : भारताने बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर ढकललं. भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. बांगलादेशची दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 133 अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा लिटन दास आणि भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यातील वादाची चर्चा सध्या होत आहे. डावाच्या 14 व्या षटकात लिटन दास आणि मोहम्मद सिराज यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी पंचांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले होते. सिराजने टाकलेल्या 14 व्या षटकात पहिला चेंडू लिटन दास खेळला. त्यानंतर सिराज लिटन दासकडे पाहून काही पुटपुटला. यावर लिटन दास भडकला आणि सिराजच्या दिशेने पुन्हा बोल असं म्हणत गेला. तेव्हा पंचांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत राहण्यास सांगितलं.
𝙎𝙞𝙧𝙖𝙟 𝙝𝙖𝙨 𝙩𝙝𝙚 𝙡𝙖𝙨𝙩 𝙡𝙖𝙪𝙜𝙝
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 15, 2022
The speedster was difficult to contain as he rattled @LittonOfficial's stumps, eventually picking up 3 before the end of Day 2 🤩🔥
Rate @mdsirajofficial's bowling effort from 1️⃣-1️⃣0️⃣?#BANvIND #SonySportsNetwork #MohammedSiraj pic.twitter.com/kdEt38w0ls
सिराज आणि लिटन यांच्यात वाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर लिटन दास क्लीन बोल्ड झाला. यानंतर सिराजने ओठांवर बोट ठेवत सेलिब्रेशन केलं. तेव्हा विराटनेही लिटन दासला डिवचलं. सिराजसोबत वादावेळी पुन्हा बोल, काही ऐकू येत नाही असं म्हणत लिटन दासने कानाला हात लावला होता. तसंच विराटने कानाला हात लावून सिराजच्या दिशेने बघत प्रतिक्रिया दिली. विराटची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हेही वाचा : VIDEO : बांगलादेशच्या प्रशिक्षकाने राहुल द्रविडची मागितली माफी, 25 वर्षांपूर्वी केलेली चूक मोहम्मद सिराजने दुसऱ्या दिवसअखेर गोलंदाजी करताना 14 धावा देत तीन गडी बाद केले. सिराजने सामन्यानंतर बोलताना लिटन दाससोबत झालेल्या वादाबाबत सांगितलं. लिटन दासला काय बोलला हे सांगताना सिराज म्हटला की, “काही नाही, मी इतकंच म्हटलं की हे टी20 क्रिकेट नाही, हे कसोटी क्रिकेट आहे.” भारताने प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजारा (90), श्रेयस अय्यर (87) आणि अश्विन (57) यांच्या अर्धशथकाच्या जोरावर 404 धावा केल्या. कुलदीप यादवने 40 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत मोहम्मद सिराजने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर नजमुल हुसैन सांतोला बाद केलं.