अर्जुनच्या नावानं निवड समितीला घातल्या शिव्या, सचिन तेंडुलकर म्हणाला...

अर्जुनच्या नावानं निवड समितीला घातल्या शिव्या, सचिन तेंडुलकर म्हणाला...

अर्जुनचं नाव वापरून केले जात होते अभद्र ट्वीट, भडकला सचिन तेंडुलकर.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे याचे नाव आजही क्रिकेट विश्वात सन्मानाने घतले जाते. मात्र सध्या ट्विटरवरून पसरवल्या जाणाऱ्या ट्वीटवरून सचिन भडकला आहे. मैदानावर आपल्या बॅटनं राग काढणारा सचिन मात्र सध्या सोशल मीडियावर भडकला आहे. याचे कारण म्हणजे सचिनचा मुलांच्या नावानं ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकरनं आजचं ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

सचिननं ट्वीट करत, “सारा आणि अर्जुन तेंडुलकर ट्विटरवर नसून, त्यांच्यान नावाने खोटे अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळं ट्वीटरनं त्वरित ही अकाउंट बंद करावे”, असे सांगितले होते. सचिनचे ट्विटरवर 30 मिलियनहून अधिक फॉलोअर आहेत. अर्जुन आणि सारा यांच्या नावाचे फेक अकाउंट असल्याचे सचिनच्या निर्दशनास आल्यानंतर त्यानं चाहत्यांना आवाहन केले.

वाचा-चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी...धोनी!

दरम्यान अर्जुनच्या नावावर तयार करण्यात आलेल्या या ट्विटर अकाउंटवर अभद्र ट्वीट केले जात आहेत. त्यामुळं सचिनने हे अकाउंट बंद करण्याची मागणी केली आहे. अर्जुनचे अकाउंट खोटे असल्याचे लक्षात आल्यानंतर सचिननं लगेगच यावर कारवाई करण्यास ट्विटर इंडियाला सांगितले. अर्जुनच्या नावावर तयार करण्यात आलेल्या या अकाउंटवर देवाचा मुलगा (Son Of God) असे बायोमध्ये लिहिले आहे. अर्जुनच्या या अकाउंटवरून वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत संजू सॅमसनला जागा न मिळाल्यामुळं निवड समितीवर टीका करणारे ट्वीट केले होते. मात्र हे अकाउंट फेक असल्याचे सचिननं सांगितले आहे.

वाचा-विराटनं नाकारल्यानंतरही संजू सॅमसनला संघात मिळाली जागा, BCCIनं सांगितलं कारण

वाचा-रोहितच्या अडचणी वाढल्या, पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या तिजोरीत खडखडाट

वर्ल्ड कप दरम्यान इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही अर्जुन तेंडुलकर खेळला होता. यावेळी अर्जुननं अनेक फलंदाजांच्या त्रिफळा उद्ध्वस्त केला. डावखुरा गोलंदाज असलेल्या अर्जुनने आपल्या गोलंदाजीनं सर्वांन प्रभावित केले. त्याचमुळं वर्ल्ड कप दरम्यान अर्जुननं इंग्लंड संघाला नेटमध्ये गोलंदाजी करवली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या नेट प्रॅक्टिसमध्येही त्याचा समावेश करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री अर्जुनच्या गोलंदाजीनं खुश झाले होते. त्यामुळं आता विदर्भात क्रिकेट खेळण्यासाठी अर्जुन सज्ज असून, या स्पर्धेत मुंबई संघानं अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.

First published: November 27, 2019, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading