चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी...धोनी!

चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 2021पर्यंत फक्त धोनी...धोनी!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे.

  • Share this:

चेन्नई, 27 नोव्हेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. धोनीनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंड विरोधात अखेरचा सामना खेळला. त्यामुळं धोनी पुन्हा कधी कमबॅक करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान आता धोनीनं आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

गेले तीन-चार महिने क्रिकेटपासून दूर असलेला धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत राहणार आहे. 2020मध्ये धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याबाबत साशंकता असताना, चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर निवृत्तीबाबत विचार करणार आहे. तसेच, 2021पर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच असणार आहे. याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीचे आंतरराष्ट्रीय करिअर संपलेले नाही, असे सुचक वक्तव्य केले होते. त्यामुळं धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करून त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेईल.

वाचा-चाहत्यांसाठी मोठी बातमी! धोनी बांगलादेशात करणार कमबॅक?

2021पर्यंत धोनी खेळणार आयपीएल

तब्बल तीन वेळा चेन्नई सुपरकिंग्ज संघाला चॅम्पियन करणारा धोनी 2021पर्यंत आयपीएल खेळत राहणार आहे. त्यामुळं धोनीकडे 2021पर्यंत सीएसकेचे कर्णधारपद असले. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार चेन्नई संघाच्या मालकांनी धोनी 2021 पर्यंत खेळत राहणार असल्याचे सांगितले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल 2021मध्ये मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळं धोनी 2021पर्यंत आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळं धोनी आणखी 2 वर्ष टी-20 क्रिकेट खेळणार आहे”, असे सांगितले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून धोनीला 15 कोटी रुपये मिळतात.

वाचा-रोहितच्या अडचणी वाढल्या, पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या तिजोरीत खडखडाट

मार्चमध्ये बांगलादेशात खेळणार क्रिकेट

दरम्यान, धोनी आता मार्चमध्ये क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र धोनी टीम इंडियाकडून नाही तर बांगलादेशमधून क्रिकेट खेळणार आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात 2 टी-20 सामने खेळतील. हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी 18 आणि 21 मार्चला होणार आहे. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं बीसीसीआयनं परवानगी दिल्यास धोनी बांगलादेशमधून क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची मागणी केली आहे.

वाचा-विराटनं नाकारल्यानंतरही संजू सॅमसनला संघात मिळाली जागा, BCCIनं सांगितलं कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CSKipl
First Published: Nov 27, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या