मुंबई, 26 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या लिलावाआधी सर्वच संघांनी जय्यत तयारी करत आहे. याआधी सर्व संघांनी काही खेळाडूंना रिटेन तर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता किती संघांकडे किती रक्कम शिल्लक आहे, याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात एकही विजेतेपद नसलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे सर्वात जास्त शिल्लक रक्कम आहे. यात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे चारवेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वात कमी पैसे आहेत. तर, जास्त रक्कमही प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे आहे. पंजाबचा संघ आपल्याकडे 9 खेळाडूंना सामिल करू शकतात, यात 4 विदेशी खेळाडू असतील. पंजाब संघाकडे आयपीएलच्या लिलावासाठी 42.70 कोटी रुपये आहेत. या किमतीत पंजाबचा संघ आयपीएल 2020च्या लिलावात 9 खेळाडू विकत घेऊ शकतात. **वाचा-** मिशन IPL 2020! रोहितसाठी धोक्याची घंटा, संघातील स्टार खेळाडू अजूनही जखमी मुंबई इंडियन्स संघ अडचणीत दरम्यान, खेळाडूंला रिटेन आणि रिलीज करून सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. मुंबई संघाला 7 खेळाडूंची गरज आहे, ज्यात 2 खेळाडू हे विदेशी असणे बंधनकारक आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईकडे फक्त 13.05 कोटी शिल्लक आहेत. त्यामुळं याच रकमेत मुंबईला जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. वाचा- युवी तू काय केलंस! ‘त्या’ एका चुकीमुळे IPLमध्ये सिक्सर किंगला मुकणार चाहते RCBला आहे 12 खेळाडूंची गरज आयपीएलच्या लिलावात कोलाकात संघाकडे पंजाबनंतर सर्वात जास्त रक्कम शिल्लक आहे. ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांच्या सारख्या खेळाडूंला रिलीज केल्यानंतर केकेआरकडे 36.65 कोटी रक्कम शिल्लक आहे. यात त्यांना एकूण 11 खेळाडू खरेदी करायचे आहेत. तर, राजस्थान संघाला 4 विदेशी खेळाडूंसह 11 खेळाडूंना विकत घ्यायचे आहे. राजस्थान संघाकडे 28.90 कोटी रक्कम शिल्लक आहे. तसेच, एकही विजेतेपद न मिळालेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला 12 खेळाडू खरेदी करायचे आहेत. त्यांच्याकडे सध्या 27.90 कोटी शिल्लक आहेत. यात त्यांन 6 भारतीय तर 6 विदेशी खेळाडू खरेदी करायचे आहेत. वाचा- धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर IPL संघांकडची शिल्लक रक्कम 1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी 2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी 3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी 4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी 5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी 6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी 7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी 8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







