मुंबई, 27 नोव्हेंबर : बांगलादेशला कसोटी आणि टी-20मध्ये चारीमुंड्या चीत केल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. 6 डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघाची निवड करण्यात आली तेव्हा विराट कोहलीनं युवा विकेटकीपर संजू सॅमसनला संघात जागा दिली नाही. फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला पुन्हा एक संधी निवड समितीनं दिली. यामुळे दिग्गजांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान आता बीसीसीआयनं ट्वीट करत संजू सॅमसनला संघाता जागा देण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेस सुरुवात होणार आहे. यासाठी संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा संजू सॅमसनचे संघात नाव नव्हते. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्यामुळे संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली. मात्र असे असले तरी संजूची फलंदाज म्हणून संघात निवड झाली आहे. विकेटकीपर म्हणून संघात ऋषभ पंतची निवड झाली आहे. दिल्लीकडून सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत असताना शिखर धवनच्या गुडघ्याला जखम झाली. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेतून धवनला माघार घ्यावी लागली. बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं शिखर धवनच्या जखमेबाबत चौकशी केल्यानंतर धवन काही काळ क्रिकेट खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळं संजू सॅमसनला पुन्हा एकदा संघात जागा मिळाली आहे. वाचा- रोहितच्या अडचणी वाढल्या, पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या तिजोरीत खडखडाट
वाचा- चाहत्यांसाठी मोठी बातमी! धोनी बांगलादेशात करणार कमबॅक? विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजूची दमदार खेळी केरळकडून खेळताना संजू सॅमसननं विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदाच्या हंगामात द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याशिवाय सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चार सामन्यात आतापर्यंत 112 धावा केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून 93 सामन्यात संजूनं 27.61च्या सरासरीनं 2209 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टीम इंडियाकडून 2015मध्ये शेवटचा सामना खेळला होता. वाचा- पराभव लागला जिव्हारी! बांगलादेशने BCCIकडे मागितले धोनीसह टीम इंडियाचे 6 खेळाडू असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा 6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई 8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद T20I मालिकेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

)







