मेलबर्न, 13 नोव्हेंबर: रोहित शर्माच्या टीम इंडियाचं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. पण जोस बटलर आणि मोहम्मद रिझवानच्या पाकिस्ताननं रोहित शर्मानं केलेली एक चूक टाळली. त्यामुळे त्यांचा फायनलचा रस्ता सोपा ठरला. इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धच्या फायनल मुकाबल्यात पहिल्या 10 ओव्हर्समध्ये वर्चस्व गाजवलं. या दहा ओव्हर्समध्ये पाकिस्ताननं आपल्या दोन विकेट्स गमावल्या. पण त्यापैकी दुसरी विकेट घेतली ती लेग स्पिनर आदिल रशिदनं. रशिदनं फायनलमध्ये आपल्या पहिल्याच बॉलवर पाकच्या युवा मोहम्मद हॅरिस या धोकादायक बॅट्समनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर बाबर आझमी महत्वाची विकेट त्यानंच घेतली. त्यामुळे हा लेग स्पिनर इंग्लंडसाठी पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड ठरला. लेग स्पिनर्सची चलती… यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आदिल रशिद आणि पाकिस्तानच्या शादाब खाननं दमदार कामगिरी बजावली आहे. रशिदनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये जास्त विकेट्स घेतल्या नसल्या तरी त्यानं मधल्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना रोखून धरण्याचं काम केलं आहे. पण सेमी फायनल आणि फायनलमध्ये त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या आहेत. सेमी फायनलमध्ये त्यानं सूर्यकुमार यादव आणि फायनलमध्ये दोन विकेट्स काढून इंग्लंडला फ्रंटफूटवर नेऊन ठेवलं.
Pakistan lose their captain as Adil Rashid picks up the big wicket of Babar Azam!#T20WorldCupFinal | #PAKvENG | 📝 https://t.co/HdpneOINqo pic.twitter.com/8YwkHBFbwg
— ICC (@ICC) November 13, 2022
दुसरीकडे शादाब खाननंही पाकिस्तानसाठी या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपर्यंत सात मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे लेग स्पिनर्सचा समावेश असलेल्या या दोन्ही टीम्स फायनलमध्ये पोहोचल्या. हेही वाचा - Sachin Tendulkar: ‘प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच…’, टीम इंडियाच्या पराभवावर सचिनचा ‘मास्टर स्ट्रोक’; Video रोहितनं चहलला बनवलं ‘वॉटर बॉय’ टीम इंडियामध्ये यंदा युजवेंद्र चहलचा 15 सदस्यीय संघात समावेश होता. पण सहापैकी एकाही मॅचमध्ये रोहितनं चहलला संधी दिली नाही. चहलऐवजी त्यानं लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल आणि ऑफ स्पिनर अश्विनला खेळवलं. पण चहलसारख्या गुणवान खेळाडूला सहाही मॅचमध्ये पाणी देण्याची वेळ आहे. यावरुन अनेक आजी माजी खेळाडूंनी टीकाही केली होती.
Did India miss a trick by not playing Yuzvendra Chahal in the T20 World Cup?#T20WorldCup #YuzvendraChahal #TeamIndia pic.twitter.com/TO0WEbEnH6
— 100MB (@100MasterBlastr) November 11, 2022
मोठी मैदानं लेग स्पिनर्ससाठी फायद्याची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी चहल हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरु शकतो असं बोललं जात होतं. पण ऑस्ट्रेलियात पोहोचताच त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. ऑस्ट्रेलियात मोठी मैदानं आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात लेग स्पिनर्सना खेळवणं हे प्रत्येक संघासाठी फायद्याचं ठरतं. ते विकेट टेकर ठरतात. इंग्लंड आणि पाकिस्ताननं याचा फायदा उठवला. पण टीम इंडियानं मात्र त्यांच्याकडे हुकमी एक्का असूनही तो ड्रेसिंग रुममध्येच बसवला. आज आदिल रशिद आणि शादाब खानची कामगिरी पाहता रोहितची ती एक चूक टीम इंडियासाठी चांगलीच महागात पडल्याचं दिसतंय.